July 4, 2025

सेक्वराइट आणत आहे एसआयए; सायबरसुरक्षेची कार्यक्षमता वाढवणारा एआय-पॉवर्ड व्हर्च्युअल सिक्युरिटी अॅनालिस्ट

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


पुणे, भारत, मे ५, २०२५: क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेड या जागतिक स्तरावरील आघाडीच्या सायबरसुरक्षा उत्पादने पुरवणाऱ्या कंपनीचा एण्टरप्राइज सिक्युरिटी विभाग सेक्वराइटने आज एसआयएचे अनावरण केले. जगभरातील उद्योगांसाठी सुरक्षितता कृतींचे (ऑपरेशन्स) भवितव्य नव्याने घडवण्याच्या उद्देशाने एसआयए अर्थात सेक्वराइट इंटेलिजंट असिस्टण्ट हे साधन विकसित करण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठे मालवेअर अॅनालिसिस आस्थापन असलेल्या सेक्वराइट लॅब्जमधील संशोधक व डेव्हलपर्सच्या टीमने अत्यंत कष्टपूर्वक विकसित केलेल्या जनरेटिव एआय क्षमतेला गो-डीप.एआय (GoDeep.AI) या स्वत:हून मालवेअर ओळखू शकणाऱ्या तंत्रज्ञानाचे बळ देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान हा एसआयएचा गाभा आहे. सायबर धोक्यांच्या वाढत्या जटीलतेवर उपाय म्हणून तयार करण्यात आलेले एसआयए हे साधन कार्यप्रवाह सुलभ करणे, धोक्यांचा तपास शिस्तबद्ध करणे आणि यूजर-फ्रेण्डली व संभाषणात्मक इंटरफेसमार्फत बुद्धिमान निर्णय शक्य करणे आदींच्या माध्यमातून कंपन्यांच्या सुरक्षिततेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडवून आणत आहे.
वाढत्या प्रमाणात जटील होत जाणारे धोके अनेक कंपन्यांना सातत्याने भेडसावत आहेत; अंगावर येण्याजोग्या संख्येतील इशारे (अॅलर्ट्स), मानवचलित प्रक्रिया आणि कुशल विश्लेषकांचा अभाव ही या समस्येची विविध अंगे आहेत. या परिस्थितीत सुरक्षिततेवर काम करणाऱ्या टीम्सना पारंपरिक सुरक्षा कृतींच्या मर्यादा ओलांडण्याची क्षमता देण्याच्या उद्देशाने एसआयएची रचना करण्यात आली आहे. एसआयएमुळे विश्लेषक (अॅनालिस्ट) तत्काळ देखरेख करून गंभीर प्रसंगांचे व्यवस्थापन करू शकतात, अॅक्सेसशी निगडित समस्यांचे निराकरण करू शकतात तसेच सुरक्षेला धोका पोहोचला असल्याचे निदर्शक जुळवून बघू शकतात आणि या सगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना काही सेकंदांच्या कालावधीत शिफारशी प्राप्त होऊ शकतात. चालू असलेली संभाषणे स्मरणात ठेवणे, रिअल-टाइम संदर्भ दाखवणे आणि आवश्यकता भासेल तेव्हा महत्त्वाचे डेटा पॉइंट्स अचूकपणे समोर आणणे या सगळ्या क्षमतांच्या जोरावर, सुरक्षिततेवर काम करणाऱ्या टीम्सकडे धोक्यांना चटकन व प्रभावीरित्या प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक बुद्धिमत्ता व स्पष्टता राहील, याची निश्चिती एसआयए करते. मनुष्यबळावरील कामाचा ताण कमी करून आणि जटील प्रक्रिया सुलभ करून एसआयए विश्लेषकांना सर्वांत गंभीर स्वरूपाच्या धोक्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मुभा देते आणि याची परिणती कार्यक्षमता सुधारण्यात, प्रतिसाद कालावधी कमी होण्यात आणि कंपनीची एकंदर सुरक्षिततेबाबतची स्थिती सुधारण्यात होते.
क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडचे सीईओ विशाल साळवी म्हणाले, “एसआयए लाँच होणे ही सायबरसुरक्षेच्या क्षेत्रात कायापालट घडवून आणणारी झेप आहे- मानवी बुद्धिमत्ता आणि जनरेटिव एआयची शक्ती यांच्यातील तफावत एसआयए दूर करणार आहे. पारंपरिक संरक्षण प्रणाली देऊ शकत असलेल्या प्रतिसादाच्या तुलनेत सायबर धोके अधिक वेगाने उत्क्रांत होत असलेल्या या काळात एसआयए सुरक्षिततेवर काम करणाऱ्या टीम्सना अभूतपूर्व वेग, स्पष्टता व अचूकता यांच्यासह काम करण्याची क्षमता पुरवते. दैनंदिन कामांचे स्वयंचलन करणे, अन्वेषणाचा वेग वाढवणे आणि सुलभ नैसर्गिक लँग्वेज इंटरफेसमार्फत तत्काळ, कृती करण्याजोगी माहिती पुरवणे यांच्या माध्यमातून सायबरसुरक्षा जास्तीत-जास्त लोकांच्या आवाक्यात आणणारे रूपांतरणात्मक साधन म्हणून एसआयए उदयाला येत आहे. हे केवळ धोक्यांच्या दोन पावले पुढे राहणे नव्हे, तर आधुनिक सुरक्षितता कृतींमधील शक्यतांची व्याख्या नव्याने करणे तसेच डिजिटल युगात स्थितीस्थापकत्वाचा नवीन मापदंड स्थापन करणे आहे.”
सेक्वराइट एक्सडीआर वापरकर्त्यांसाठी एसआयए तत्काळ उपलब्ध आहे आणि लवकरच सेक्वराइटच्या सायबरसुरक्षा साधनांच्या सर्वसमावेशक संचातही त्याचा समावेश केला जाणार आहे. डिजिटलकेंद्री युगात सुरक्षित पद्धतीने जोमाने वाढण्याची क्षमता व्यवसायांना देणारी अत्याधुनिक, भारतात तयार झालेली सायबरसुरक्षा साधने देण्याप्रती आपली बांधिलकी सेक्वराइटने या नवीनतम नवोन्मेष्कारी साधनाच्या माध्यमातून दृढ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button