किया इंडियाकडून ‘कॅरेन्स क्लॅव्हिस’ लाँच

पुणे, ८ मे २०२५: किया इंडिया या आघाडीच्या मास-प्रीमियम कारमेकरने कॅरेन्स पोर्टफोलिओमधील नवीन कार ‘कॅरेन्स क्लॅव्हिस’च्या लाँचची घोषणा केली आहे. ही बिग, बोल्ड आणि स्पेसिअस ३-रो (तिसऱ्या रांगेतील सीटमध्ये एैसपैस जागा) वेईकल आहे. कॅरेन्स क्लॅव्हिस आजच्या मोठ्या, आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या वेईकलमध्ये आरामदायीपणा, एैसपैस जागा व आकर्षक डिझाइनसह प्रगत तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि भविष्यवादी आकर्षकता आहे.
‘क्लॅव्हिस’ नाव लॅटिन वाक्य क्लॅव्हिस ऑरियामधून घेण्यात आले आहे. ज्याचा अर्थ ‘गोल्डन की’ असा होतो. कॅरेन्स क्लॅव्हिस अपवादात्मक ६-आसनी व ७-आसनी आरामदायीपणा, आकर्षक डिझाइन, प्रीमियम स्पेस आणि प्रगत तंत्रज्ञान देते, ज्यामधून आजच्या डायनॅमिक कुटुंबांना सुधारित, उद्देश-केंद्रित अनुभव मिळतो.
किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ग्वांग्गू ली म्हणाले, ”आम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यतेला प्राधान्य देतो, ज्याला प्रगत तंत्रज्ञान आणि विशिष्ट डिझाइनचे पाठबळ आहे. लाँच करण्यात आलेली कॅरेन्स क्लॅव्हिस आमच्या प्रवासामधील प्रमुख टप्पा आहे, ज्यामधून गतीशील, प्रीमियम व उद्देश-केंद्रित दृष्टिकोनाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.
डिझाइन
कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये आकर्षक डिझाइन असून अपराइड एसयूव्ही-सारख्या स्टान्समध्ये आकर्षकता आणि स्पोर्टीनेसचे संयोजन आहे. या वेईकलची हाय-टेक वैशिष्ट्ये आणि प्रगत रचना आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंगसाठी प्रेरित करतात. प्रत्येक लाइन व पृष्ठभाग आकर्षक, स्टायलिश, प्रबळ व अद्वितीय आधुनिक डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामधून साहसी, पण सुरक्षित उत्साह दिसून येतो.
एक्स्टीरिअर: लक्षवेधक उपस्थिती, भविष्यवादी अपील
प्रमुख एक्स्टीरिअर वैशिष्ट्यांमध्ये किया डिजिटल टायगर फेस, आइस क्यूब एफएफआर एलईडी हेडलॅम्प्ससह एलईडी डीआरएल आणि स्टारलॅम्प एलईडी कनेक्टेड टेललॅम्प्स आहेत.यामुळे विशिष्ट व आधुनिक रिअर सिग्नेचर मिळतात.
रस्त्यावर लक्ष वेधून घेणारी वैशिष्ट्ये म्हणजे ४३.६६ सेमी (१७ इंच) क्रिस्टल कट ड्युअल टोन अलॉई व्हील्स, रॉबस्ट फ्रण्ट अँड रिअर स्किड प्लेट्ससह सॅटिन क्रोमे फिनिश, साइड डोअर गार्निश इन्सर्ट्स – मेटल पेंट आणि नवीन आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस बॉडी कलर देण्यात आला आहे. दैनंदिन ड्राइव्ह्सपासून साहसी प्रवासापर्यंत कॅरेन्स क्लॅव्हिस मोठ्या एसयूव्ही स्टायलिंगसह एक्स्प्लोरेशनचा उत्साह देते.
इंटीरिअर्स: प्रत्येक प्रवासासाठी डिझाइन करण्यात आलेली स्मार्ट लक्झरी
गाडीतील तिसऱ्या व दुसऱ्या रांगेतील सीटमध्ये एैसपैस जागेसह स्लायडिंग, रिक्लायनिंग आणि वन-टच इलेक्ट्रिक टम्बल, तसेच सहज अॅक्सेस व स्पेस अॅडजस्टमेंटसाठी सेगमेंट-फर्स्ट वॉक-इन लेव्हर (बॉस मोड) अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश आहे. केबिन अनुभवामध्ये बेस्ट-इन-सेगमेंट ६७.६२ सेमी (२६.६२ इंच) ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेलसह अधिक वाढ करण्यात आली आहे.
कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये ६४-कलर अॅम्बियण्ट लायटिंग आहे, जे तुमचा मूड व स्टाइलनुसार केबिनमधील वातावरण ऑप्टिमाइज करण्याची सुविधा देते. या वेईकलमध्ये शुद्ध हवेसाठी सीट-माऊंटेड एअर प्युरिफायर आहे आणि रूफ-माऊंटेड डिफ्यूज एअर व्हेंट्स केबिनमध्ये सौम्य व समान एअरफ्लो देतात. सेगमेंट-फर्स्ट वन-टच इलेक्ट्रिक डबल फोल्डिंग सीट्समुळे तिसरी रो सहजपणे उपलब्ध होते.
एैसपैस जागा आणि हवेशीर केबिनचा आनंद घेणाऱ्यांसाठी ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ आकाशाचे व्यापक, विनाव्यत्यय व्ह्यू देते, तसेच प्रत्येक प्रवासादरम्यान खुल्या हवेचा अनुभव देते. बेस्ट-इन-सेगमेंट इन्फोटेन्मेंट / टेम्परेचर कंट्रोल स्वॅप स्विचसह आरामदायीपणामध्ये विचारपूर्वक वाढ करण्यात आली आहे, जे वातावरण व इन्फोटेन्मेंट कंट्रोल्स, हवेशीर फ्रण्ट सीट्ससह ४-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीटदरम्यान सर्वोत्तम टॉगलिंग देते. ऑडिओप्रेमी बोस प्रीमियम ८-स्पीकर साऊंड सिस्टमचे कौतुक करतील, जी संपन्न व सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देते.
अद्वितीय सोयीसुविधेचा अनुभव
कॅरेन्स क्लॅव्हिसने अधिक आरामदायीपणा, सुरक्षितता आणि व्यावहारिकतेसाठी प्रगत वैशिष्ट्यांसह स्तर उंचावला आहे. सर्वोत्तम वैशिष्ट्य म्हणजे पॉवर विंडो ऑटो अप/डाऊनसह रिमोट कंट्रोल, जे अधिक सुलभ वापरासाठी दुरून सर्व विंडोज उघडण्याची व बंद करण्याची सुविधा देते. सुरक्षितता व ड्रायव्हर अवेअरनेसमध्ये वाढ करत क्लॅव्हिसमध्ये ३६०-डिग्री कॅमेरासह क्लस्टरमध्ये एकीकृत केलेले ब्लाइण्ड व्ह्यू मॉनिटर (बीव्हीएम) आहे, जो आसपासच्या परिसराचे सुस्पष्ट व सर्वसमावेशक व्ह्यू देतो. कार्यक्षम अपीलमध्ये अधिक भर करत कॅरेन्स क्लॅव्हिसच्या रिअल डोअर्समध्ये सेगमेंट-फर्स्ट स्पॉट लॅम्प्स इल्यूमिनेशन आहे.
सुरक्षितता आणि कार्यक्षमता: प्रगत संरक्षण, आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंग
कॅरेन्स क्लॅव्हिस इंटेलिजण्ट तंत्रज्ञानांच्या सर्वसमावेशक श्रेणीसह सुरक्षितता व नाविन्यताप्रती कियाची कटिबद्धता अधिक दृढ करते. या वेईकलमध्ये बेस्ट-इन-सेगमेंट एडीएएस लेव्हल २, २० ऑटोनॉमस वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये स्मार्ट क्रूझ कंट्रोल (एससीसी)सह स्टॉप अँड गो, फॉरवर्ड कॉलिजन अव्हॉयडण्स असिस्ट, फ्रण्ट कॉलिजन-अव्हॉयडण्स असिस्ट-डायरेक्ट ऑनकमिंग, लेन किपिंग असिस्ट, ब्लाइण्ड स्पॉट कॉलिजन वॉर्निंग, क्लस्टरमध्ये ब्लाइण्ड व्ह्यू मॉनिटर, रिअर क्रॉस ट्रॅफिक कॉलिजन अव्हॉयडण्स असिस्ट आणि इतर अनेक ऑटोनॉमस सुरक्षिता वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये एकत्र काम करत प्रत्येक ड्राइव्ह स्मार्टर व अधिक सुरक्षित करतात. कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये १८ प्रगत वैशिष्ट्यांचे प्रमाणित रॉबस्ट सेफ्टी पॅकेज देखील आहे, जसे सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, रिअर ऑक्यूपण्ट अलर्ट इत्यादी. कॅरेन्स क्लॅव्हिस प्रत्येक कौटुंबिक प्रवास विनासायास व सुरक्षित असण्याची खात्री देते.
ही वेईकल तीन शक्तिशाली पॉवरट्रेन पर्यायांमध्ये (स्मार्टस्ट्रीम जी१.५ पेट्रोल आणि स्मार्टस्ट्रीम जी१.५ टर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिन्स, तसेच डी१.५ डिझेल) उपलब्ध आहे. स्मार्टस्ट्रीम जी१.५ टर्बोमध्ये आता ऑल-न्यू मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय आहे, जे सुधारित नियंत्रण आणि अधिक डायनॅमिक, सर्वसमावेशक ड्राइव्ह देते. कॅरेन्स क्लॅव्हिस एचटीई, एचटीई (ओ), एचटीके, एचटीके+, एचटीके+ (ओ), एचटीएक्स आणि एचटीएक्स+ या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल.