रंगत-संगत प्रतिष्ठान, आम्ही एकपात्रीतर्फेनितीन कुलकर्णी यांना नगरकर स्मृती पुरस्कार

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्री यांच्या वतीने पहिल्या वंदन राम नगरकर स्मृती पुरस्काराने कोल्हापूर येथील एकपात्री कलावंत, सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 18 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध एकपात्री कलावंत वंदन राम नगरकर यांनी त्यांच्या हयातीत एकपात्री कलावंतांकरिता मोलाचे कार्य केले. त्यांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षीपासून वंदन राम नगरकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ रंगकर्मी बण्डा जोशी यांच्या हस्ते होणार असून उत्तरार्धात ‘हास्यवंदन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.