प्रतिभावान, हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन ‘प्रतिबिंब’

पुणे : पुणे कॉटन कंपनी, देहम् नेचर क्युअर आणि कृतार्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 ते 10 मे या कालावधीत हौशी छायाचित्रकारांच्या ‘प्रतिबिंब’ या छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
छायाचित्र प्रदर्शनी बालगंधर्व कला दालनात भरविण्यात येणार असून उद्घाटन दि. 8 रोजी सकाळी 10:30 वाजता सुप्रसिद्ध पक्षी छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस यांच्या हस्ते होणार आहे. देहम् नेचर क्युअरचे संचालक डॉ. सुजय लोढा, डॉ. कोमल लोढा, कृतार्थचे संचालक निलेश शुक्ला, दिपाली शुक्ला, क्रिकेट विश्लेषक-समालोचक सुनंदन लेले यांची प्रमुख उपस्थितीती असणार आहे. प्रदर्शन तीनही दिवस सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत सर्वांसाठी खुले असणार आहे.
अमर अतितकर, अमेय वाळवेकर, ओंकार मुळगुंद, केदार दंडगे, विलास तोळसंकर, समीर अय्यर, विश्वेश बेहरे, अनंतप्रसाद देशपांडे, अमोद फडके आणि सागर मुथा यांची व्यन्यजीव, पक्षी, निसर्ग या विषयांवरील अनोखी छायाचित्रे प्रदर्शनात असणार आहेत. प्रदर्शनात हसभागी छायाचित्रकार वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून छायाचित्रणाची आवड जोपासत आहेत. प्रदर्शनाची रचना ओंकार मुळगुंद यांची आहे. हौशी, प्रतिभावान छायाचित्रकारांची वैविध्यपूर्ण छायाचित्रे अनुभवण्याचा आनंद पुणेकरांना मिळणा