July 4, 2025

पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ शोमधून जिंकतायत प्रेक्षकांची मन

0
IMG-20250427-WA0045
Spread the love

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, आता कीर्तनाची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा महाराष्ट्रातील कीर्तनकारांवर आधारित असलेला पहिला वहिला रिॲलिटी शो असून याने कीर्तनकारांना खूप मोठी संधी देणारा प्लॅटफॉर्म ‘सोनी मराठी’ वाहिनीनं उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली जातेय. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून १०८ कीर्तनकारांसह हा शो सुरू झाला आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानानं रसिकांसमोर आणला. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या सोनी मराठी वाहिनीच्या रिॲलिटी शो अंतर्गत महाराष्ट्रातील कीर्तनकारांना खूप मोठा रंगमंच मिळाला आहे. छोट्या पडद्यावर कीर्तन करण्याची मिळालेली संधी हा त्यांच्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. सध्या या शोला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून प्रेक्षकांची पसंती मिळतेय. प्रेक्षक वर्ग, रसिक चाहते मंडळी या शोला भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. विशेष करून सबंध महाराष्ट्रातून या शोला उदंड प्रतिसाद मिळतोय कारण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेले कीर्तनकार त्यांच्या कीर्तनसेवेने सगळ्यांची मने जिंकत आहेत.

सोनी मराठी वाहिनीच्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा कीर्तनकार’ या मंचावर अधिकतर पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकार सबंध महाराष्ट्राच लक्ष वेधून घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कीर्तन या विषयाची अधिक गोडी आहे. कीर्तन हा प्रकार मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आणि म्हणूनच या पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकारांसाठी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिॲलिटी शो सोनी मराठी वाहिनीने उपलब्ध करून दिला आहे. आणि जमेची बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात या शोला तुफान लोकप्रियता मिळत असून येथील कीर्तनकार त्यांच्या कीर्तनांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडत आहेत. विशेषता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, इचलकरंजी, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हयांमधील ४२ कीर्तनकारांच कीर्तन प्रेक्षकांना आवडल आहे म्हणूनच ते दुसऱ्या भागात पोहोचले आहेत. या कीर्तनकारांनी त्यांच्या कलाकृतीच्या जोरावर पहिल्या फेरीत बाजी मारत शोच्या पुढील भागात पदार्पण केले आहे, त्यामुळे प्रेक्षकांनाही त्यांच्या या आवडत्या कीर्तनकारांचे कीर्तन आगामी भागांमध्ये ऐकायला मिळेल.

ह.भ.प. राधाताई सानप आणि ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील या दिग्गज कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाखाली या कीर्तनकारांना त्यांची कला जगासमोर आणण्याची प्रेरणा या शोमार्फत मिळतेय. तर सोनी मराठी वाहिनीचे सिनियर वाईस प्रेसिडंट अमित फाळके आणि दिग्दर्शक-निर्माते प्रतीक कोल्हे आणि निर्माते उदय पानसरे यांनी या शोच्या निर्मितीची धुरा उत्तमरित्या पेलवली आहे. या शोला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हे कीर्तनकार काय नवीन विषय मांडत प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणार हे पाहण रंजक ठरेल. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिॲलिटी शो सोमवार ते शनिवार, सायंकाळी ६ वाजता म्हणजेच तिन्हीसांजच्या वेळेला भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी पाहायला विसरू नका ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’. आता कीर्तनाची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button