July 2, 2025
WhatsApp Image 2025-04-24 at 18.43.30_a49ff5f7
Spread the love

मराठा आंत्रप्रेन्योर असोसिएशनच्या अध्यक्षपदी विक्रम गायकवाड यांची निवड

पुणे : मराठा आंत्रप्रेन्योर असोसिएशन पुणे विभागाच्या अध्यक्षपदी विक्रम गायकवाड यांची निवड झाली आहे. संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून प्रमोद साठे, विजय गवारे आणि नितीन बाबा भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तर, संघटनेचे सचिव म्हणून साई बहिरट पाटील यांची निवड झाली आहे.

सन २०२५-२६ व २०२६-२७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे. मराठा आंत्रप्रेन्योर असोसिएशन ही मराठा उद्योजकांना एकत्र आणणारी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी संघटना आहे. उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येतात.

संघटनेचे संयुक्त सचिव म्हणून तेजस चरवड आणि किशोर जगताप यांची निवड झाली आहे तर कोषाध्यक्षपद राजेश कुराडे आणि संयुक्त कोषाध्यक्ष म्हणून धनंजय वाळके यांची निवड झाली आहे. मराठा आंत्रप्रेन्योर असोसिएशन ही संघटना उद्योग क्षेत्रातील नव्या संधी शोधणे, प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे, उद्योजकांना एकत्र आणणे या उद्दिष्टांसाठी कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button