August 21, 2026

सेझरॅककडून दोन नवीन ब्रँड्स अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट लाँच, ज्यासह भारतातील व्हिस्की पोर्टफोलिओचा विस्तार केलापुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये पदार्पण करत अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट भारतातील व्हिस्की प्रेमींना अमेरिकन व्हिस्कीची खास चव देणार

0
Southern Comfort
Spread the love


भारत, १७ ऑगस्ट २०२६: सेझरॅक कंपनी या जगातील सर्वात मोठ्या डिस्टिल्ड स्पिरिट्स कंपनीने आज भारतात दोन नवीन अमेरिकन व्हिस्की ब्रँड्सच्या लाँचची घोषणा केली – डबल गोल्ड ब्लेंडेड व्हिस्की ‘अमेरिकन वुल्फ’ आणि कोणत्याही कृत्रिम फ्लेवरशिवाय बनवलेली ‘साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्की’. दोन्ही ब्रँड्सची सुरुवात पुणे, नागपूर आणि नाशिकमधून होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये विस्तार केला जाईल. हे दुहेरी लाँच सेझरॅकचे जगातील सर्वात मोठ्या व्हिस्की बाजारपेठ भारतातील आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या माध्यमातून भारतीय ग्रेन आणि माल्ट स्पिरिट्सच्या मिश्रणासह अमेरिकन व्हिस्कीची खास चव भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
“भारत व्हिस्कीची उत्सुकता वाढवणारी आणि वेगाने बदलणारी बाजारपेठ आहे आणि भारतातील ग्राहकांना अमेरिकन व्हिस्कीची चव, तिचे वैशिष्ट्य आणि वारशाची ओळख करून देण्याची एक मोठी संधी आम्हाला येथे दिसते,” असे सेझरॅकचे ग्लोबल मार्केटिंग व्हॉइस प्रेसिडेंट डिएगो बिआंची म्हणाले. “अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्कीद्वारे आम्ही बाजारपेठेत दोन अतिशय वेगळ्या प्रकारची उत्पादने आणत आहोत, ज्यातील एक धाडस, महत्त्वाकांक्षा आणि व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे, तर दुसरे सहजता आणि सुलभतेवर आधारित आहे. भारतात व्हिस्कीच्या विविध आणि वेगळ्या अनुभवांसाठी नक्कीच वाव आहे, या आमच्या विश्वासाचेच प्रतिनिधीत्व ही उत्पादने एकत्रितपणे करतात.”
अमेरिकन वुल्फ: व्हिस्कीची नवीन श्रेणी
अमेरिकन वुल्फ अद्वितीय मिश्रणाद्वारे भारतातील ग्राहकांसाठी व्हिस्कीची नवीन श्रेणी घेऊन येत आहे. यात कोणत्याही कृत्रिम फ्लेवरचा वापर न करता अस्सल अमेरिकन व्हिस्कीचे वैशिष्ट्य आणि निवडक भारतीय ग्रेन व माल्ट स्पिरिट्स एकत्र केले आहेत. ठाम आणि वेगळी ओळख असणारी अमेरिकन वुल्फ आपली वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या आजच्या व्हिस्की प्रेमींसाठी तयार करण्यात आली आहे. नीट, बर्फासोबत किंवा सोड्यासोबत आनंद घेता येईल अशा पद्धतीने डिझाइन केलेली ही व्हिस्की अमेरिकन व्हिस्कीपासून प्रेरित असलेली बोल्ड चव भारतातील बाजारपेठेत आणते. अमेरिकन वुल्फ सुरुवातीला ७५० मिली, १८० मिली आणि ९० मिली या पॅकमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये ७५० मिली बाटलीची किंमत संबंधित राज्याचे कर आणि किमतींच्या नियमांनुसार साधारण १,०७० रूपये असेल.
साउदर्न कम्फर्ट: अमेरिकन व्हिस्कीची सहज आणि सुलभ चव
१५० वर्षांहून अधिक काळ अमेरिकन वारसा लाभलेली साउदर्न कम्फर्ट नवीन आणि आकर्षक स्वरूपात भारतात परतत आहे. १९९० च्या दशकातील या व्हिस्कीच्या पूर्वीच्या उपस्थितीमुळे भारतातील अनेक ग्राहकांसाठी हे नाव ओळखीचे आहे. साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्की सहज, सोपा आणि आरामदायी अनुभव देण्यासाठी अमेरिकन व्हिस्कीला भारतीय माल्ट आणि ग्रेन स्पिरिटसोबत मिश्रित करते. “गेट कम्फर्टेबल” या भावनेवर आधारित ही व्हिस्की बर्फासोबत किंवा तिच्या चवीचा पूर्ण आनंद घेण्यासाठी थोडे पाणी मिसळून पिण्यासाठी बनवण्यात आली आहे. साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्की सुरुवातीला ७५० मिली पॅकमध्ये उपलब्ध असेल आणि त्यानंतर १८० मिली व ९० मिली या पॅकमध्ये येईल. ७५० मिली बाटलीची किरकोळ किंमत संबंधित राज्याचे कर आणि किमतींच्या नियमांनुसार साधारण १,५०० रूपये असेल.
“भारत जगातील सर्वात मोठी व्हिस्कीची बाजारपेठ आहे आणि येथील ग्राहक आता नवनवीन प्रकार, आंतरराष्ट्रीय ट्रेंड्स आणि वेगळे पर्याय सातत्याने शोधत आहेत,” असे सेझरॅकचे ग्लोबल मार्केटिंग व्हॉइस प्रेसिडेंट डिएगो बिआंची म्हणाले. “भारतातील ग्राहक अमेरिकन जीवनशैली, मनोरंजन आणि संस्कृतीकडून अधिकाधिक प्रेरणा घेत आहेत, तसतसे तीच शैली त्यांच्या ग्लासमध्ये आणण्याची स्पष्ट संधी आम्हाला दिसते. अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट हे दोन्ही ब्रँड्स याच संकल्पनेवर आधारित आहेत, फक्त दोन वेगवेगळ्या प्रसंगांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत.”
ऑगस्ट २०२६ पासून पुणे, नागपूर आणि नाशिकमधील स्टोअर्सच्या शेल्फवर, तसेच निवडक बार आणि हॉटेल्समध्ये अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर उर्वरित वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी इंस्टाग्रामवर @AmericanWolf_India आणि @SouthernComfort_India ला फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी