August 22, 2026

विश्र्वेश कुलकर्णी यांना आडकर फौंडेशनचा जिद्द जीवनगौरव पुरस्कार

0
IMG-20260820-WA0017
Spread the love


पुणे : आडकर फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या जिद्द जीवनगौरव पुरस्काराने शिका व कमवा या योजनेद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना स्वावलंबी शिक्षण रोजगाराचा मार्ग दाखविणारे यशस्वी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विश्र्वेश कुलकर्णी यांचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रम बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. आडकर फौंडेशन आणि रंगत-संगत प्रतिष्ठानचा हा सोळाशेवा कार्यक्रम आहे. पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे असणार आहेत. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : विश्र्वेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी