August 22, 2026

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’!

0
IMG-20260820-WA0016
Spread the love

-औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

पुणे | प्रतिनिधी : औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना निवांत वेळ घालवता यावा, एकमेकांशी गप्पा मारता याव्यात, योगाभ्यास तसेच विविध उपक्रम राबवता यावेत, यासाठी औंध येथील राम-लक्ष्मण उद्यानात नगरसेवक सनी निम्हण यांच्या विकासनिधीतून ‘विश्रांती कट्टा’ उभारण्यात येणार आहे. पुण्यनगरीचे उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर यांच्या शुभहस्ते या ‘विश्रांती कट्ट्या’चे भूमिपूजन संपन्न झाले.

यावेळी नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, सौ. सपनाताई छाजेड, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. हनुमंतराव पडवळ, राम-लक्ष्मण गार्डनचे सचिव श्री. मेघराज चंदनाणी यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहून काम करत असताना त्यांच्या अनेक गरजा आणि अपेक्षा जवळून समजून घेता आल्या. विशेषतः योगाभ्यास, सकाळचा व्यायाम, एकमेकांशी संवाद साधणे आणि निवांत वेळ घालवण्यासाठी योग्य जागेची गरज ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. राम-लक्ष्मण उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या या अपेक्षेची जाणीव झाली आणि त्यातूनच ‘विश्रांती कट्टा’ उभारण्याची संकल्पना पुढे आली.

नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे मार्गदर्शक आणि संस्कारांचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून पुढील पिढीला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ सुविधा निर्माण करणे नव्हे, तर त्यांना सन्मानाने, आनंदाने आणि आपुलकीच्या वातावरणात वेळ घालवता यावा, ही आपली जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या मनातील ही गरज जाणवली आणि त्यातूनच ‘विश्रांती कट्टा’ची संकल्पना साकारली. हा कट्टा त्यांच्या आनंदाचा, संवादाचा आणि आरोग्याचा केंद्रबिंदू ठरेल, याचा मला आनंद आहे.”

आयुष्याच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये आपल्या वडीलधाऱ्या नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने वेळ घालवता यावा, प्रदूषणमुक्त वातावरणात योगाभ्यास करता यावा तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबवता यावेत, यासाठी हा कट्टा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले संस्कार, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हीच समाजसेवेची खरी प्रेरणा आहे. समाजाची सेवा करणाऱ्या आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम साकारताना विशेष आनंद होत आहे. सर्वांच्या सहकार्याने राम-लक्ष्मण उद्यानात हा ‘विश्रांती कट्टा’ उभा राहत आहे, ही समाधानाची बाब आहे.

या भूमिपूजन सोहळ्यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी दिलेली शाबासकी आणि व्यक्त केलेला आनंद हीच माझ्या कामाची खरी पोचपावती आहे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद यापुढेही आमच्या पाठीशी राहावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी