September 24, 2026

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

0
IMG-20260916-WA0043
Spread the love


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे स्वागत व सन्मान

पुणे : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते. ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत करीत यथोचित सन्मान केला.

ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावे आणि पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे, असा संकल्प करीत गणरायाचरणी मान्यवरांनी प्रार्थना केली.

  • फोटो ओळ : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. ट्रस्टतर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी