September 24, 2026

-गणेशोत्सवात पारंपरिक वाद्य आणि खेळांची प्रात्यक्षिके पथकांनी समाविष्ट करावीढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ महाराष्ट्र ; कार्यकारिणीची बैठकीद्वारे आवाहन

0
IMG-20260912-WA0050
Spread the love

पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असून त्यामध्ये राज्याच्या विविध भागातील ढोल ताशा पथकांचा मोठा सहभाग असणार आहे. त्यामुळे यंदा ढोल ताशांसोबतच आगमन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य आणि तालांचे व खेळांचे सादरीकरण करण्याचे आवाहन ढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ महाराष्ट्र च्या कार्यकारिणीची बैठकीत करण्यात आले.

बैठकीत अध्यक्ष पराग ठाकूर, सचिव संजय सातपुते, खजिनदार ॲड. शिरीष थिटे, सदस्य विलास शिगवण, आशुतोष देशपांडे हे पुण्यातून तर अनिरुद्ध देशपांडे (नागपूर) ,अतुल दौंडकर ( पिंपरी चिंचवड) सुभाष लाडे ( मुंबई) सिद्धू जित्ता ( सोलापूर) हे महासंघ पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पुणे शहर अध्यक्ष अक्षय बलकवडे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष विशाल मानकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत कुडक्याल यांची देखील उपस्थिती होती.

पराग ठाकूर म्हणाले, गणेशोत्सव आगमन मिरवणुकांमध्ये आणि सोसायटयांमधून होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक वाद्य आणि खेळांची प्रात्यक्षिके यांचा समावेश करण्यात यावा. तसेच ढोल वाद्यांचे पारंपरिक पाच हातांचे सादरीकरण व्हावे. तसेच लेझिम, ध्वज, ढाल तलवार, टिपरी , साहसी खेळांची प्रात्यक्षिक सादरीकरण अनेक पथकांमध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व पथकांना देखील असा सहभाग घ्यावा. रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, गुणवान वादकांचा गौरव, आरोग्य शिबिर हे उपक्रम राबवण्यात यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर , मुंबई , नाशिक, नागपूर , अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर येथील पथकां ना संपर्क करून याबाबत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. ढोल ताशा पथकांच्या अडचणी सोडवणे, या ऐतिहासिक कलेचा प्रचार प्रसार करणे, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे यासाठी महासंघाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शाळांमधून ढोल ताशा, लेझीम , टिपरी , ढाल तलवार , ध्वज या कला प्रकारांना प्राधान्य मिळावे यासाठी आग्रही भूमिका घ्यावी असेही या बैठकीत ठरले. राज्य सरकार च्या कार्यक्रमात ढोल ताशा वादनास प्राधान्य मिळणे साठी प्रयत्न करावे असे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी