September 24, 2026

-ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; शेकडो वर्षांची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू

0
IMG-20260912-WA0049(1)
Spread the love

पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात आगमन झाल्यानंतर श्रीमन्महासाधू मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. चिंचवड मधून श्री मोरया गोसावी पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात श्री जयति गजाननाच्या दर्शनासाठी थांबण्याची गेल्या शेकडो वर्षांची परंपरा आहे.

प्रथेनुसार ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचे सांप्रत ठकार, महिला वहिवाटदार, पुजारी पालखीचे औक्षण करतात. शेकडो वर्षांची ही परंपर आजही अव्याहतपणे चालू आहे. यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, विश्वस्त स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मंदिराच्या विश्वस्त संगीता ठकार, मधुरा ठकार, सीमा ठकार, सुधा ठकार, गायत्री ठकार उपस्थित होत्या. चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव यांनी ग्रामदैवत श्री कसबा गणपती चे दर्शन घेतल्यानंतर आशापूरक ठकार यांनी मंदार महाराज देव यांचे स्वागत केले. तसेच सीमा ठकर यांनी त्यांचे औक्षण केले.

दरवर्षी माघ आणि भाद्रपद महिन्यच्या शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध चतुर्थी दरम्यान श्रीमन्महासाधू मोरया गोसावी यांची चिंचवड ते मोरगाव अशी पायी पालखी यात्रा संपन्न होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला या पालखी सोहळ्याने चिंचवड येथून मोरगावकडे प्रस्थान केले. यानंतर पालखी सोहळा मुक्कामी मार्गस्थ झाला. चिंचवड देवस्थान आयोजित या पालखी यात्रेतील ग्रामदैवत श्री कसबा गणपती दर्शन हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.

श्री कसबा गणपती मंदिरात भाद्रपद गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात भजनसंध्या, तबला-व्हायोलिन जुगलबंदी, अथर्वशीर्ष पठण, अभिषेक, भक्तिगीते, ढोल-ताशा वादन तसेच गणेशजन्म आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गणेश चतुर्थीला गणेशजन्म आरती सोहळा
सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सकाळी श्रींची महापूजा, चौघडा वादन आणि अभिषेक होणार आहे. दुपारी १२.३० ते २ या वेळेत ‘श्री’ गणेशजन्म आरती सोहळा होणार असून रात्री शेजारती आणि छबिन्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी चौघडा वादन व अभिषेक, तर रात्री शेजारती आणि प्रसाद भजन होणार आहे.

  • फोटो ओळ : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात आगमन झाल्यानंतर श्रीमन्महासाधू मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी