September 25, 2026

​”मेफेड्रोन (M.D.) हा अंमली पदार्थाचा साठा विक्रीकरीता जवळ बाळगणाऱ्या चार इसमांना केले जेरबंद”

0
IMG-20260901-WA0038
Spread the love

​दिनांक २९/०८/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांच्याकडील अधिकारी व पथक पुणे शहर हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, समर्थ पोलीस ठाणे, पुणे यांच्या हद्दीत सात इसम बी.डी. कॅम्प चौक खाकसार मशिदीजवळ, मेफेड्रोन (M.D.) हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहेत.
​अशी बातमी मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अं.प.वि.प.-१ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमूद ठिकाणी सापळा रचून सात पैकी चार इसमांना बी.डी. कॅम्प चौकाकडून आईना व खाकसार मशिदीकडे जाणाऱ्या रोडवर मि. बीलोबो यांच्या वाड्याच्या भिंतीलगत नाना पेठ, पुणे येथून ताब्यात घेतले:
​नासिर रसूल शेख (वय २२ वर्षे, रा. मोहम्मद अली रोड, गल्ली नं. १४ ए, मोहम्मदवाडी, सय्यदनगर, हडपसर, पुणे)
​जावेद हसन शेख (वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. १८, शिवनेरी नगर, कोंढवा, पुणे)
​फराज नाजिर शेख (वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. २८, सय्यदनगर, आशियाना हॉटेलजवळ, हडपसर, पुणे)
​एक विधीसंघर्षग्रस्त बालक
​जप्त केलेला मुद्देमाल:
​मेफेड्रोन (M.D.): ७१.८० मिग्रॅ (किंवा ग्रॅम)
​वाहने: २,००,०००/- रु. किमतीच्या तीन गाड्या
​मोबाईल: २५,०००/- रु. किमतीचा एक Vivo कंपनीचा मोबाईल
​एकूण मुद्देमाल: ४,४०,४००/- रुपये
​सदर इसमांवर समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९५/२०२६, एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​कारवाई करणारे पथक:
मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. हसन गौहर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली:
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक: श्रीमती तृप्ती सोनवणे
​पोलीस उपनिरीक्षक: योगेश कोतकर
​सहाय्यक पोलीस फौजदार: विठ्ठल साळुंके, आशा भिंगारे
​पोलीस अंमलदार: मद्देल, अमोल सरडे, क्षीरसागर, साळुंके, राजे, गुंड व अक्षय शिकारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी