September 24, 2026

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-साहित्य आणि संगीत-संशोधन पुरस्कार वितरण समारंभ रविवारी

0
IMG-20260831-WA0044
Spread the love

पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-साहित्य पुरस्कार आणि स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-संशोधन पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश शाळेच्या आवारातील गणेश सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध ध्रुपद गायक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री व संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते डॉ. ऋत्विक सन्याल यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार विजय कुवळेकर, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त ॲड. अशोक वळसंगकर, प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ. विकास कशाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी., कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
डॉ. प्रभाताई अत्रे यांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि संगीत क्षेत्रातील संशोधन व दस्तऐवजीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे या वर्षीपासून ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-साहित्य पुरस्कार’ आणि ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-संशोधन पुरस्कार’ देण्यात येणार आहेत.
संगीत साहित्य पुरस्कार : प्रथम : प्रा. अंजली मालकर, द्वितीय : माधवी नानल, तृतीय : विदुषी शमा भाटे तर संगीत-संशोधन पुरस्कार : प्रथम : डॉ. अर्पिता वैशंपायन, द्वितीय डॉ. पल्लवी पोटे, तृतीय डॉ. निरजा उदय वाघ यांना प्रदान केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभानंतर प्रा. अंजली मालकर यांच्या ‘हिंदुस्थानी अभिजात संगीतचा इतिहास’ या पुस्तकावर आधारित सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
प्रति,
मा. संपादक
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-साहित्य पुरस्कार आणि स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-संशोधन पुरस्कार वितरण समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
डॉ. भारती एम. डी., सचिव, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन
प्रसाद भडसावळे, कार्यक्रम निर्देशक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी