डॉ. सदानंद मोरे यांना ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती सन्मानआडकर फौंडेशनतर्फे रविवारी कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ, विचारवंत, प्रवचनकार ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद यांचा गौरव केला केला जाणार आहे. कार्यक्रम रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कराचे वितरण ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ, शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. के. जैन, ॲड. अविनाश आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. ॲड. भास्करराव आव्हाड यांनी शून्यातून विश्र्व निर्माण करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. आडकर फौंडेशनतर्फे गेल्या ३० वर्षांपासून ॲड. आव्हाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या ७ सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे.
फोटो : डॉ. सदानंद मोरे
प्रति,
मा. संपादक
आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ, विचारवंत, प्रवचनकार ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद यांचा रविवारी गौरव केला केला जाणार आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
ॲड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, आडकर फौंडेशन
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
