प्रेमभावछटांचा प्रवास ‘अष्टनायिका २.०’ शुक्रवारी
पुणे : प्रेम भावनेची विविध रूपे दर्शविणाऱ्या भावछटांचा प्रवास ‘अष्टनायिका २.०’ या कार्यक्रमाद्वारे बंदिशींच्या माध्यमातून उलगडून दाखविला जाणार आहे. कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आयोजित कार्यक्रम शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. साईराग एन्टरटेंनमेंट यांनी कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
भारतीय काव्यपरंपरेतील अष्टनायिका या संकल्पनेला समकालीन संदर्भ देत, कथा, शब्द आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून या आठ भावविश्वांना स्वतंत्र बंदिशींच्या माध्यमातून रंगमंचावर साकारले जाणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सायली पानसे यांनी या बंदिशींची रचना केली असून त्यांच्या संकल्पना व लेखनातून हा संगीत प्रवास साकारला जाणार आहे.
ऋषिकेश बडवे आणि रागेश्री वैरागकर बंदिशींचे सादरीकरण करणार असून अभिजित बारटक्के (तबला), निलय सालवी (संवादिनी) साथसंगत करणार आहेत, अशी माहिती कलासक्त कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त डॉ. विनिता आपटे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : सायली पानसे
प्रति,
मा. संपादक
प्रेम भावनेची विविध रूपे दर्शविणाऱ्या भावछटांचा प्रवास ‘अष्टनायिका २.०’ या कार्यक्रमाद्वारे बंदिशींच्या माध्यमातून उलगडून दाखविला जाणार आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
श्रीरंग कुलकर्णी, अध्यक्ष, कलासक्त कल्चरल फाऊंडेशन
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
