September 26, 2026

श्री राघवेंद्र स्वामींच्या ३५५व्या आराधना महोत्सवाचे आयोजन

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे : श्री राघवेंद्र स्वामींच्या ३५५व्या आराधना महोत्सवाचे आयोजन श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ, सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड, पुणे येथे दि. २९ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. जगद्गुरु श्रीमन्मध्वाचार्य मूळ महासंस्थानम्, नंजनगुडू यांच्या वतीने तसेच मठाच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा होणार आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता ध्वजारोहण, प्राणप्रतिष्ठा, शाकोत्सव, धनधान्य पूजा व लक्ष्मी पूजा होणार आहे. तसेच उपाकर्म कार्यक्रमांतर्गत ऋग्वेदीय उपाकर्म २६ ऑगस्ट रोजी, तर यजुर्वेदीय उपाकर्म २८ ऑगस्ट रोजी होणार असून नित्य कार्यक्रम सकाळी ७ वाजता आणि नूतन विधी सकाळी ९ वाजता होणार आहेत.

आराधना महोत्सवाच्या तीन दिवसांत विविध धार्मिक सेवा पार पडतील. सुप्रभात सेवा सकाळी ५.३० वाजता, पंचामृत अभिषेक सकाळी ८ वाजता, उत्सवाराय पाद्यपूजा व कनकमहा पूजा सकाळी ११ वाजता, त्यानंतर अलंकार, हस्तोदक, महामंगलारती व तीर्थप्रसाद दुपारी १२.०५ वाजता होईल. सायंकाळी ५ वाजता दासवाणी, तर सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत रथोत्सव, स्वस्तिवाचन, डोलोत्सव व महामंगलारती होणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता महा रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कुमारी सुजाता देवन यांचा दासवाणी कार्यक्रम, ३० ऑगस्ट रोजी याच वेळेत आनंद भीमसेन जोशी यांचा दासवाणी कार्यक्रम, तर ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

मठाचे पीठाधिपती परमपूज्य श्री श्री १०८ डॉ. श्री श्री सुबुधेंद्र तीर्थरू यांच्या आदेशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आराधना महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तात्रय जोशी गुरुजी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी