September 26, 2026

फडणवीसांनी वायफळ बोलघेवडे पणा कमी करावा..!विरोधकांवर बेछूट आरोप करताना, फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची गरिमा जपावी, बोध्दीक दिवाळखोरी’चे प्रदर्शन करू नये..!!

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


⁃प्रदेश काँग्रेस’चे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची उपरोधिक टिका..!
पुणे दि २३ : मोदी – शहांना खुश करण्यासाठी, ‘काँग्रेस’वर सतत तथ्यहीन व बेमालूम टीका करण्याचा एक कलमी अजेंडा’ राबवण्याच्या नादात, फडणवीसांची राजकीय अपरिहार्यता समजू शकते, परंतू त्याच वेळी फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याचे विसरत चालले असून त्यातुन आपल्या ‘बौध्दीक दिवाळखोरीचेच’ अधिक प्रदर्शन करतायेत, याची दया येते अशी उपरोधिक टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!

ते पुढे म्हणाले की, उठता बसता काँग्रेस’ला दुषणे देण्याच्या नादात.. २०२३ सप्टेंबर मध्ये लोकसभेत (जवळपास एकमताने) मान्य झालेल्या ३३% महीला आरक्षण विधेयकात, परीसीमन (डी लीमिटेशन) विधेयक मान्य झाल्या शिवाय (विद्यमान ५४३ जणांच्या संसदेत) ‘महीला आरक्षण देऊ नये’, असे कुठेही नमुद केले नसल्याची, माहिती फडणवीसांना तरी किमान असायला हवी अन्यथा, महीला आरक्षणास काँग्रेस’चा विरोध असल्याचे निर्बुद्धपणे सांगत, फडणवीस आपली पुन्हा – पुन्हा बोध्दीक दिवाळखोरीच का जाहीर करत आहेत..? असा सखेद आश्चर्य जनक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस, आपल्या शिर्ष नेतृत्वास भाजप’ने २०२४ लोकसभा निवडणुकीत, ‘महीला आरक्षण वा तेवढ्या महिला उमेदवार’ ही न दिल्याने, भाजप’चा ‘महीला विरोधी चेहरा’ उघडा पडला व महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ ऱ्जागा ‘काँग्रेस मविआ’ला मिळाल्या व केवळ १७ (१/३) जागा भाजप-महायुतीस मिळाल्याची वास्तवता देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या ‘भाषणजीवी नेतृत्वास समजावून सांगावी व पुन्हा पुन्हा काँग्रेस’वर अतार्किक व दिशाभूल करणारी विधाने करू नयेत व वैचारिक प्रगल्भतेचे दर्शन करावे, असा सल्ला वजा आवाहन काँग्रेसचे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी फडणवीसांच्या, राहुलजी गांधी यांचे महीला धोरण विषयक चुकीच्या व दिशाभूल करत वक्तव्यावर प्रसिद्धी पत्राद्वारे उत्तर दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी