September 26, 2026

नागपंचमीच्या निमित्ताने राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला अत्याधुनिक सर्प रेस्क्यू उपकरणांची भेट

0
IMG-20260821-WA0027
Spread the love

पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२६ : नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टच्या वतीने गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे यांनी राजीव गांधी प्राणीसंग्रहालयास सापांच्या सुरक्षित रेस्क्यूसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक व परदेशातून आयात केलेली उपकरणे आज सप्रेम भेट देण्यात आली.

सापांचे सुरक्षित रेस्क्यू, त्यांचे संरक्षण तसेच मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने ही उपकरणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सर्पमित्र व प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना साप हाताळताना अधिक सुरक्षितता मिळावी आणि सापांना कोणतीही इजा न होता त्यांचे सुरक्षित स्थलांतर करता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी उपअधीक्षक सरडे मॅडम, संचालक राजकुमार जाधव साहेब तसेच हेड ॲनिमल किपर कौशिक काशीकर, प्राणीमित्र बाळासाहेब ढमाले, डॉ प्रवीण बढे,अथर्व भोसले,तेजस कराड, अथर्व बाणखेले,अजित कासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागपंचमीच्या निमित्ताने केवळ धार्मिक परंपरा न पाळता सर्पसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जनजागृतीला चालना देणारा हा उपक्रम सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टच्या सामाजिक व पर्यावरणपूरक कार्याची दिशा अधोरेखित करणारा ठरला.

नागपंचमीच्या निमित्ताने केवळ पारंपरिक पूजनापुरते मर्यादित न राहता सर्पसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जनजागृतीला प्रत्यक्ष चालना देणारा हा उपक्रम सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टच्या सामाजिक व पर्यावरणपूरक कार्याची ठळक ओळख अधोरेखित करणारा ठरला.

— सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट

गुरुवर्य श्री प्रकाशभाऊ शिंदे,
(मठाधिपती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी