September 26, 2026

संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन

0
IMG-20260818-WA0023
Spread the love

पुणे :  भारतीय संविधान आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा अवमान करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात पुणे शहर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय संविधानवादी नागरिकांच्या वतीने २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी कॉँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे पुणे (पूर्व विभाग) शहराध्यक्ष कुणाल राजगुरू, विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, संग्राम रोहम आदि मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या घटनात्मक सर्वोच्च पदावर असलेले वरिष्ठ संसदीय सभागृहाचे सदस्य व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ८ ऑगस्ट २०२६ रोजी विजय शंखनाद रॅलीच्या कार्यक्रमासाठी उत्तराखंड मधील हलदानी येथील  रामलीला मैदानावर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जातीयवादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी गोमूत्र शिंपडून मैदान पवित्र केल्याचा दावा केला आहे, ही कृती म्हणजे केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचाच नव्हे तर भारतीय संविधानाचा अवमान असल्याचे समितीने म्हटले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी