September 26, 2026

वर्ल्ड स्केट फ्लँडर्स ग्रँड प्रिक्स, युरोपियन रोलर स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये ओजसला १ रौप्य व २ कांस्य पदके

0
IMG-20260818-WA0027
Spread the love

एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थ्याने दाखविली जागतिक स्तरावर चमक

पुणे, १८ ऑगस्ट: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी ओजस सुयोग कुलकर्णी याने भारताचे प्रतिनिधित्व करत बेल्जियममधील ओस्टेंड येथे आयोजित “वर्ल्ड स्केट – फ्लँडर्स ग्रँड प्रिक्स, युरोपियन रोलर स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप २०२६” मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

ओजसने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी खेळ दाखवत ३ पदके पटकावली या मध्ये रौप्य पदक (२०० मीटर फ्लाइंग लॅप ), कांस्य पदक( १००० मीटर ट्रॅक रेस ) आणि कांस्य पदक ( शॉर्ट ट्रॅक रेस सिरीज) मधील मानांकन मिळाले आहे. ही स्पर्धा १३ ते १६ ऑगस्ट २०२६ या दरम्यान बेल्जियममधील ओस्टेंड येथे पार पडली.

त्याच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड आणि कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड यांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

युवा पुरुष गटात जगातील आणि युरोपमधील काही अव्वल युवा स्केटर्ससोबत स्पर्धा करत ओजसने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी कामगिरी नोंदवली.

ओजस हा एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या CSE AI & DS या ६-वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. आंतरराष्ट्रीय रोलर स्पीड स्केटिंगमधील आपला प्रवास सुरू असताना, ओजसचे हे यश त्याचे समर्पण, वेग, दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेचा ध्यास दर्शवते.

त्याच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. दत्ता दंडगे, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे आणि क्रीडा विभागाचे संचालक डॉ. वैभव वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.

जनसंपर्क विभाग
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी