September 26, 2026

कसबा गणपती मंदिरात लक्ष दुर्वा गणेशयाग

0
IMG-20260813-WA0021
Spread the love

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर

पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात रविवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी असणाऱ्या श्रावण शुद्ध चतुर्थी अर्थात विनायकी चतुर्थीच्या निमित्ताने लक्ष दुर्वा गणेशयागाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने एक लाख दुर्वांचे हवन करण्यात येणार असून, हा गणेशयाग मंदिराच्या सभामंडपात श्री जयती गजाननाच्या मूळ मूर्तीसमोर दोन दिवस संपन्न होणार आहे.

या गणेशयागाची सुरुवात शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी होणार असून सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत यागविधी होईल. तसेच सायंकाळी ७ ते ८ या वेळेत मंत्रजागर आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत यागविधी होऊन पूर्णाहुती आणि महाआरतीने गणेशयागाची सांगता होणार आहे.

श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुःखांचा आणि अनिष्टतेचा नाश करणारी म्हणून दुर्वेचे महत्त्व सांगितले जाते. दुर्वेच्या उत्पत्तीच्या कथा श्री गणेश पुराण तसेच श्री मुद्गल पुराणात आढळतात. दुर्वेची महती सांगणारे दुर्वा स्तोत्रही मुद्गल पुराणात उपलब्ध आहे. पार्वती देवीने भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत केलेल्या श्री गणेश पार्थिव पूजाविधीची सुरुवात याच श्रावण शुद्ध चतुर्थीपासून केल्याचे संदर्भ आढळतात. या पार्श्वभूमीवर विनायकी चतुर्थीचे औचित्य साधून लक्ष दुर्वा गणेशयागाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यानिमित्त गणेशभक्तांनी श्री जयती गजाननाच्या मूळ मूर्तीचे दर्शन तसेच गणेशयागाच्या निमित्ताने होणाऱ्या मंत्रोच्चाराचे श्रवण यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी