September 26, 2026

-वेनकॉब पुणे श्री २०२६ स्पर्धेत अक्षय वाडीकर विजेताअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे ‘वेनकॉब पुणे श्री २०२६’ स्पर्धेचे आयोजन

0
IMG-20260812-WA0036
Spread the love

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित म्हसोबा उत्सवानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना, फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शरीरसौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने व सहकार्याने महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा पातळीवरील भव्य पारितोषिकांची असणारी ‘वेनकॉब पुणे श्री २०२६’ जिल्हास्तरीय खुल्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अक्षय वाडीकर ‘वेनकॉब पुणे श्री २०२६’चा विजेता ठरला, त्याला रु १ लाख रुपये पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

स्पर्धेत एकूण १२५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन आनंद पिंपळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय इंडियन बॉडीबिल्डिंग फिटनेस अँड फेडरेशनचे खजिनदार राजेश सावंत, श्री शिव छत्रपती पुरस्कार सन्मानित सिद्धार्थ मोरे, पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे, गौतम तांबे, प्रशांत जगताप, दिलीप धुमाळ आणि विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एकूण ३ लाख १३ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. पारितोषिक वितरण प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील ‘वेनकॉब पुणे श्री २०२६’ किताबाचा मान अक्षय वाडीकर याने पटकावला. ‘वेनकॉब पुणे श्री २०२६’ उपविजेतेपद आकाश दडमल याला मिळाले ‘अपकमिंग बॉडी बिल्डर’ किताब सलमान नालबंद याला, ‘बेस्ट पोझर’ किताब ऋषिकेश वेळमकर याला, तर ‘मोस्ट इम्प्रुव्ह्ड बॉडी बिल्डर’ किताब सोहम चाकणकर याला प्रदान करण्यात आला.

  • स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
    ५५ किलो गट – १) सलमान नालबंद, २) विशाल खुडे, ३) नामदेव कारंडे, ४) रवी गुजराती, ५) राजेश आंग्रे, ६) वैभव भंडारी.

६० किलो गट – १) अजय ओझरकर, २) वेदस पवार, ३) अमेय पंडित, ४) साहिल वाड, ५) रोशन विश्वकर्मा, ६) विनायक मोहिते.

६५ किलो गट – १) शुभम शेवाळे, २) प्रतीक पाटील, ३) शुभम शिंदे, ४) राजेश स्वामी, ५) आर्यन मोरे, ६) अमित चौगुले.

७० किलो गट – १) अभय वाडीकर, २) जय नवघरे, ३) अजय रक्काटे, ४) सचिन सावंत, ५) ओंकार माने, ६) संजीव राजवडे.

७५ किलो गट – १) आकाश दडमल, २) सचिन हगवणे, ३) स्वजस थरकुडे, ४) संकेत हगवणे, ५) तुषार शिंदे, ६) ऋषिकेश वेळमकर.

८० किलो गट – १) अक्षय शिंदे, २) मयूर पवार, ३) निखिल ढोणे, ४) महेश कामत, ५) इम्तियाज खान, ६) अक्षय तायडे.

८० किलो वरील गट – १) सोहम चाकणकर, २) फिरोज शेख, ३) गणेश ठेंगळ, ४) शुभम गिरी, ५) गोपाळ सोलंकी, ६) राजवीर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी