September 26, 2026

676 संजीवन समाधी सोहळा बातमीनामाचे महत्त्व अधोरेखित करणारे विश्व संत नामदेव महाराजांचे कार्य अमूल्य आनंद पिंपळकर

0
IMG-20260812-WA0024
Spread the love


पुणे. न्याय समता बंधुता आणि सहिष्णुता याचा मिलाप म्हणजे विश्व संत नामदेव महाराज आहेत.
संपूर्ण भारतभर भ्रमण करून आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा सर्वदूर नेली एवढेच नाही तर गुरु ग्रंथ साहेबांतील त्यांच्या पदांनी देखील शीख धर्मीयांना आपले महत्त्व अधोरेखित केले. त्यांची ही बंधूतेची शिकवण आजही तरुणांना प्रेरणादायीच आहे
676 व्या संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ आयोजित कोथरूड पश्चिम विभाग नामदेव शिंपी समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. आपल्या निस्वार्थ भक्तीने नामाचे महत्त्व आजही इतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. सकारात्मकता हीच खरी यशाची गुरुकिल्ली असून मनाच्या मशागतीसाठी नामदेवांचे विचारच आपल्याला तारणार आहेत. आपल्या आयुष्याची जडणघडण ही संस्कारांवर अवलंबून असते. समाजाची प्रतिमा ही संतांच्या विचारातून प्रतीत होत असते. त्यामुळे आपल्या कुलपुरुषाची विचारधारा तेवत ठेवण्याचे काम आपल्या प्रत्येकाचे आहे ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर उद्योजक प्रभाकर गणबोटे वास्तुशास्त्र विशारद अनंत पिंपळकर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष दिलीप कुमार वायचळ म्हणाले आपल्या कुलपुरुषाचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या माध्यमातून होत आहे माणसं जोडण्याची कला या समाजाकडे मूलभूत असून संघटन कौशल्य काळाची गरज आहे. एकत्रित कुटुंब पद्धती मध्ये सामावून .घेण्याचा सहज भाव या समाजाकडे निश्चितच आहे . पारंपरिक व्यवसायाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य या समाजातील पिढीने केले असून सामाजिक जबाबदारीचे भान राखत आहे. संजीवन समाधी सोहळा निमित्त एकत्रित आलेल्या सर्व बांधवांनी आपल्या नामदेवरायांची विचारांची प्रेरणा घेऊन तरुण पिढीला आदर्शवत बनवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
याप्रसंगी दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तुकाराम मुंढे यांचे पुस्तक देऊन करण्यात आला. तरुण पिढीचे आधुनिक तुकाराम या पिढीने वाचले पाहिजे असेही यावेळी ते मिळाले.
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता झाली संदीप गुजर भारत चुंबळकर कौशिक वायचळ वर्षा बागडे मिलिंद मिरजकर पल्लवी खटावकर यांनी अन्नदान केले. हरीश पानसरे रत्नाकर निरगुडे पंकज सुत्रावे सुप्रिया अवसरे नबिता खोडके सुनील बारटक्के स्मिता महेंद्रकर यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना कोर्टी कर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी