-श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे वारकऱ्यांसाठी वाल्हे येथे भोजन व्यवस्थापरतीच्या वारी प्रवासात आयोजन ; तब्बल २ हजार ५०० वारकऱ्यांचा सहभाग
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूरहून आळंदीस परत येणाऱ्या श्रींच्या वारी प्रवासात वाल्हे येथील शाळेत वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील २ हजार ५०० वारक-यांनी या सेवेचा लाभ घेतला.
ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल तसेच प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दरवर्षी केला जातो. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले यांसह विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माऊलींच्या पादुकांना नैवेद्य दाखवून वारकरी भोजनाला प्रारंभ झाला. मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व व्यवस्था केली होती. पुण्यात पालखी आगमनाच्या वेळी देखील मंदिरामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा दिली जाते. विविध प्रकारच्या तपासण्या व औषध वाटप देखील केले जाते. त्याचप्रमाणे पालखीच्या परतीच्या प्रवासात भोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- फोटो ओळ : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूरहून आळंदीस परत येणाऱ्या श्रींच्या वारी प्रवासात वाल्हे येथील शाळेत वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये सहभागी वारकरी व ट्रस्टचे विश्वस्त.
