August 6, 2026

डॉ. किशोर सरपोतदार यांना आदर्श संयोजक पुरस्काररंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी होणार गौरव

0
IMG-20260804-WA0019
Spread the love


पुणे : सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श संयोजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराने यंदा पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
फोटो : डॉ. किशोर सरपोतदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी