August 6, 2026

काइनेटिक समूहाकडून ऐतिहासिक काँफी टेबल बूकचे प्रकाशन‘काइनेटिक एनर्जी – इंडियाज ओरिजिनल पिपल मूव्हर्स’ वाचकांकडे सुपूर्त

0
Image 02 (1)
Spread the love


पुणे, ६ ऑगस्ट २०२६ : गेल्या ५० दशकांहून कंपनीच्या ऐतिहासिक प्रवासातील प्रेरणादायी टप्पे उलघडवून सांगणाऱ्या ‘काइनेटिक एनर्जी – इंडियाज ओरिजिनल पिपल मूव्हर्स’ या काँफी टेबल बूकचे प्रकाशन आज कंपनीचे संस्थापक श्री अरूण फिरोदिया, काइनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड आणि काइनेटिक वॉट्स अँड वोल्ट्स लिमिटेडचे व्हाइस चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य फिरोदिया, प्रख्यात ऑटोमोटिव्ह इतिहासकार आणि पत्रकार आदिल जल दरुखानावाला यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
भारताच्या मोबिलिटी क्षेत्रात काइनेटिकचे योगदान मोठे आहे. पाच दशकांहून अधिक काळ काइनेटिक हे नवकल्पना, सुलभता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक राहिले आहे. प्रतिष्ठित लूना द्वारे लाखो भारतीयांना परवडणारी वैयक्तिक मोबिलिटी उपलब्ध करून देण्यापासून ते क्रांतिकारी काइनेटिक डीएक्सद्वारे शहरी प्रवासाला नवी दिशा देण्यापर्यंत, भारताच्या मोबिलिटीच्या इतिहासाला आकार देण्यात कंपनीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आज ही उल्लेखनीय परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी काइनेटिक इलेक्ट्रिक एनर्जीच्या माध्यमातून जतन करण्यात आली आहे. कंपनीचा हाच वारसा आज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यातूनच आज आय एम काइनेटिक कम्युनिटीची सुरूवात झाली आहे.
जवळपास १८० पृष्ठे, ज्यामध्ये शेकडो दुर्मिळ छायाचित्रे, अभिलेखीय साहित्य, ऐतिहासिक दस्तऐवज आणि प्रत्यक्ष अनुभवांचा खजिना काइनेटिकच्या असामान्य प्रवासाची नोंद करतात. प्रख्यात ऑटोमोटिव्ह इतिहासकार आणि पत्रकार आदिल जल दरुखानावाला यांनी लिखित, समृद्ध छायाचित्रांनी सजलेले हे प्रकाशन काइनेटिक लिगसी मिट दरम्यान प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक भारताच्या मोबिलिटी क्षेत्रातील काइनेटिकच्या चिरस्थायी योगदानाचा गौरव करतानाच इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या युगातील त्याच्या नव्या प्रवासाचीही नोंद केली आहे. लेखक दारुखानवाला यांच्या काइनेटिकसोबतच्या त्यांच्या चार दशकांहून अधिक काळाच्या सहवासामुळे पुस्तक अधिक समृद्ध झाले आहे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या प्रवासाचे त्यांनी जवळून निरीक्षण केले असून, ऐतिहासिक संशोधन, दुर्मिळ अभिलेखीय साहित्य आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्या अनोख्या संगमामुळे हे पुस्तक काइनेटिकच्या उल्लेखनीय प्रवासाचे एक प्रामाणिक दस्तऐवज बनले आहे.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना काइनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड आणि काइनेटिक वॉट्स अँड वोल्ट्स लिमिटेडचे व्हाइस चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य फिरोदिया म्हणाले,
“Kinetic’s Electric Energy ही गेल्या पाच दशकांमध्ये आमच्या प्रवासाला आकार देणाऱ्या दूरदृष्टी, नवकल्पना आणि व्यक्तींना वाहिलेली आदरांजली आहे. काइनेटिकने नेहमीच नवकल्पनांच्या माध्यमातून लोकांना सक्षम करण्यावर भर दिला आहे आणि हे पुस्तक आमची प्रतिष्ठित उत्पादने, चिरस्थायी भागीदारी आणि आमचा वारसा घडवणाऱ्या मूल्यांचा गौरव करते. आम्हाला आशा आहे की हे पुस्तक केवळ आमच्या भूतकाळाची नोंद म्हणूनच नव्हे, तर भविष्यातील नवोन्मेषक, उद्योजक आणि ऑटोमोबाईलप्रेमींसाठी प्रेरणास्त्रोत म्हणूनही कार्य करेल. इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नव्या युगात प्रवेश करत असताना, I AM KINETIC समुदायाच्या माध्यमातून आमचा वारसा जपताना आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देताना आम्हाला अभिमान वाटतो.”
पुस्तकाबद्दल आपले विचार व्यक्त करताना Kinetic’s Electric Energy चे लेखक आदिल जल दरुखानावाला म्हणाले,
“काइनेटिकची कथा ही केवळ एका ऑटोमोबाईल ब्रँडच्या उत्क्रांतीची कथा नाही, तर ती भारताच्या मोबिलिटीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून, दैनंदिन वाहतुकीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या आणि आजही भविष्यातील मोबिलिटीला प्रेरणा देणाऱ्या कंपनीचा वारसा जतन करण्याचा माझा प्रयत्न आहे.”
Kinetic’s Electric Energy चे प्रकाशन काइनेटिकच्या प्रवासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर होत आहे, जेव्हा कंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक वेगाने वाढवत आहे. सर्व-नवीन इलेक्ट्रिक Kinetic DX च्या माध्यमातून काइनेटिक नव्या पिढीतील रायडर्सशी पुन्हा नाते जोडत असताना, हे प्रकाशन एका उल्लेखनीय वारशाला वाहिलेली आदरांजली असून, नवकल्पनांच्या दिशेने ब्रँडच्या सातत्यपूर्ण वाटचालीचाही गौरव करते.


या कार्यक्रमादरम्यान I AM KINETIC समुदायाचाही शुभारंभ करण्यात आला. काइनेटिकच्या उल्लेखनीय प्रवासाचा भाग राहिलेल्या ग्राहक, कर्मचारी, डीलर्स, संग्राहक, भागीदार आणि काइनेटिकप्रेमींना एकत्र आणण्यासाठी समर्पित असा हा एक उपक्रम आहे. काइनेटिकला लाखो लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवणाऱ्या कथा, आठवणी आणि सामायिक अनुभवांचा हा मंच गौरव करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी