July 12, 2026

दलित पँथरच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात भरगच्च कार्यक्रम-महापौर मंजुषा नागपुरे यांचा नागरी सत्कार; उपमहापौर परशुराम वाडेकर यांना ‘पॅंथर रत्न’ पुरस्कार

0
IMG-20260712-WA0049
Spread the love

पुणे | प्रतिनिधी

दलित पँथरच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांचा पुणेकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असून, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांना प्रतिष्ठेचा ‘पॅंथररत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक विभागाचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे, सहआयुक्त मनोज पाटील, माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासह विविध क्षेत्रातील एकूण ५४ मान्यवरांचा ‘पॅंथरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

याशिवाय, देऊळबंद २ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे तसेच अभिनेते रमेश परदेशी यांचा जाहीर नागरी सत्कारही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत नडगम म्हणाले, “१९७२ साली अन्याय, अत्याचार आणि विषमतेविरुद्ध संघर्षाची मशाल पेटवणाऱ्या दलित पँथर चळवळीचा ५४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवावी.”

कार्यक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचे विशेष व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला दलित पँथरचे केंद्रीय उपाध्यक्ष श्रीकांत लोणारे, प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद सरवडे, पुणे शहराध्यक्ष आकाश पायाळ, जनसंपर्क प्रमुख बंडू गवळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी