हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी सोमवार, ६ जुलै रोजी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला सदिच्छा भेट दिली.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेल्या ‘लाइफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ (एलटीसी) या मूल्य आधारित आणि परिवर्तनकारी शिक्षणाची संकल्पना समजावून घेतली. हिमाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांना या शिक्षण अनुभवाचा लाभ घेता यावा यासाठी त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली.
राजकारणात सुशिक्षीतांनी यावे या साठी विद्यापीठाने सुरू केलेल्या अशिया खंडातील एकमेव ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ याची विस्तृती माहिती घेऊन याचे कौतूक केले. शिक्षण, नवोपक्रम आणि युवा सक्षमीकरणाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी असलेली एमआईटी डब्ल्यूपीयूची सामूहिक वचनबद्धता स्पष्ट दिसते असे ही राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी सांगितले.यावेळी डावीकडून डाॅ.संंजय उपाध्ये, डाॅ. राहुल कराड, राज्यपाल कविंदर गुप्ता, नमिष किल्लेमशेट्टी व गणेश पोकळे.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे.
