June 12, 2026

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे ‘जागर स्त्रीशक्तीचा, सन्मान आईचा’ कार्यक्रम

0
IMG-20260612-WA0016
Spread the love

पुणे, १२ जून २०२६ : महाराष्ट्रातील आघाडीची शैक्षणिक संस्था असलेल्या प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे दिवंगत सौ. नवल इंद्रमान सिंग यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त ‘जागर स्त्रीशक्तीचा, सन्मान आईचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, १४ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे होणार आहे.

या कार्यक्रमात ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेले विनोदी कलाकार कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

हा कार्यक्रम केवळ जयंती सोहळा नसून समाज आणि कुटुंब घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माता आणि महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. प्रेम, त्याग, जिव्हाळा आणि निःस्वार्थ सेवाभाव जपणाऱ्या प्रत्येक आईला आणि महिलेला मानवंदना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र इंद्रमान सिंग म्हणाले, “सौ. नवल इंद्रमान सिंग यांनी आपल्या प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावाने अनेकांच्या आयुष्यात स्थान निर्माण केले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आईचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”

सौ. नवल इंद्रमान सिंग यांनी साधेपणा, नम्रता आणि माणुसकी यांचा आदर्श जपला. प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने वागणे, सर्वांना आपलेसे करणे आणि प्रेमाने आदरातिथ्य करणे ही त्यांची खास ओळख होती. त्यांच्या जीवनमूल्यांमधूनच या कार्यक्रमाची प्रेरणा घेतली गेली आहे.

या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील महिला, सांस्कृतिक कलाकार आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होणार आहेत. स्त्रीशक्ती, मातृत्व, प्रेम, त्याग आणि माणुसकी या मूल्यांचा गौरव या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स विषयी

१९८२ मध्ये स्थापन झालेल्या प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सला चार दशकांहून अधिक काळाचा शैक्षणिक वारसा लाभला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ११ पेक्षा अधिक कॅम्पसमध्ये १४ शाखांद्वारे सुमारे १७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ६०० हून अधिक शिक्षक व कर्मचारी तसेच १३ हजारांपेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांचे मजबूत जाळे संस्थेशी जोडलेले आहे.

संस्था गुणवत्तापूर्ण, परवडणारे आणि सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, सर्जनशीलता, तंत्रज्ञान कौशल्ये आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्यावर भर देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी