May 30, 2026

-शंभू राजेंचा जन्मापासून अमरत्वापर्यंतचा थरारक प्रवास ‘ वीरांचे वीर धर्मवीर’मधून उलगडणारविवेक व्यासपीठ आयोजित ‘वीरांचे वीर धर्मवीर’ हा अभिनव कार्यक्रम ; दृकश्राव्य माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटाचे अभिवाचन, चलचित्र, ॲनिमेशन आणि संगीताच्या माध्यमातून सादरीकरण ; विनामूल्य प्रवेश

0
IMG-20260527-WA0047
Spread the love

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम, युद्धनीती आणि स्वराज्य रक्षणासाठीच्या अतुलनीय संघर्षाचा जीवनप्रवास ‘वीरांचे वीर धर्मवीर’ या विवेक व्यासपीठ आयोजित अभिनव कार्यक्रमातून उलगडण्यात येणार आहे. शंभू चरित्र – जन्मापासून अमरत्वापर्यंत मांडणारा हा दृकश्राव्य प्रयोग शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता लेडी रमाबाई हॉल, एस. पी. कॉलेज, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास पुण्याच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि सादरीकरण नीलेश रमेश भिसे यांचे असून, संभाजी महाराजांचे जीवन, त्यांचे कार्य, लेखन, विविध मोहिमा आणि युद्धनीती यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात येणार आहे. अभिवाचन, चलचित्र, ॲनिमेशन, संगीत आणि प्रकाशयोजनेच्या माध्यमातून इतिहासातील विविध प्रसंग जिवंत केले जाणार आहेत.

नीलेश भिसे म्हणाले, जन्मापासून ते अमरत्वापर्यंतचा संभाजी महाराजांचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडण्यात येणार आहे. कोणतीही लढाई न हरता स्वराज्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांनी दिलेला लढा, त्यांची ग्रंथसंपदा, न्यायनिवाडे, हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी घोड्याच्या पाठीवर लादलेले सिंहासन आणि औरंगजेबाला दिलेली कडवी झुंज यांचे प्रभावी चित्रण या कार्यक्रमात करण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी