May 24, 2026

-शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांची निवडसन २०२६ ते २०३१ कार्यकाळासाठी विश्वस्त मंडळाची निवड जाहीर

0
IMG-20260524-WA0005
Spread the love

पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या नवीन विश्वस्त मंडळाची सन २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी शाहीर गणेशदादा टोकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्षपदी प्रा. शाहीरा संगीता मावळे, सचिवपदी अरुणकुमार बाभुळगांवकर तसेच सहसचिवपदी अक्षदा इनामदार यांची निवड करण्यात आली.

विश्वस्त सदस्य म्हणून प्रा. शाहीरा रुपाली देशपांडे, शाहीर चेतन हिंगे, होनराज मावळे आणि नंदिनी देवकर यांची निवड करण्यात आली आहे. जनसंपर्क, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख प्रा.पुष्कर औरंगाबादकर आणि व्यवस्थापक सीए आदिती जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रबोधिनी शाहिरी क्षेत्रात अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असून विनामूल्य पोवाडे प्रशिक्षण, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा व कलेची जोपासना करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी