May 10, 2026

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या ‘जय गणेश सेवालयाचे’ भूमीपूजनश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मंदिराशेजारी गणेश भक्तांसाठी विविध सेवा होणार उपलब्ध

0
IMG-20260509-WA0021
Spread the love


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश मंदिरा शेजारील जागेत साकारण्यात येणाऱ्या ‘जय गणेश सेवालयाचे’ भूमीपूजन नुकतेच पार पडले. सेवालयाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीने विविध सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

भूमीपूजन सोहळयाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय गणेश सेवालय ही वास्तू मंदिराशेजारील जागेत साकारण्यात येत आहे. यामध्ये भाविकांसाठी स्वच्छतागृह, लहान मुले व मातांच्या सोयीसाठी स्तनपान केंद्र, लगेज काऊंटर, चप्पल स्टॅन्ड, सुरक्षा केंद्र, मोबाईल डिपॉझीटी काउंटर, प्रशासकीय कार्यालय, इन्फॉर्मेशन सेंटर, प्रथमोपचार सुविधा आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सेवालयाचे काम पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्याचा संकल्प असून हे सेवालय पाच मजली असणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश मंदिरा शेजारील जागेत साकारण्यात येणाऱ्या ‘जय गणेश सेवालयाचे’ भूमीपूजन नुकतेच पार पडले. सेवालयाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीने विविध सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी