May 8, 2026

दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने एआय मशीन द्वारे मोफत दंत स्कॅन तपासणी सुविधा

0
IMG-20260508-WA0007
Spread the love

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
जय गणेश रुग्णसेवा अभियान

‘एआय’ मशीन द्वारे
दंत तपासणीची मोफत सुविधा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानातील फिरत्या दंत रुग्णवाहिकेत अत्याधुनिक एआय मशीन द्वारे दंत तपासणी (स्कॅनिंग)ची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अत्याधुनिक एआय मशीन सात लाख रुपये किमतीचे असून स्कॅनओ एआय कंपनी तर्फे ट्रस्टला नुकतेच भेट देण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.शुभम मुंडे, डॉ.विश्वेश ठाकरे, डॉ.सोमेश माने यांचे या उपक्रमासाठी ट्रस्टला सहकार्य लाभले.

कळावे.

आपला,
सुनील रासने,
अध्यक्ष,
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी