केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक
मुंबई दि. 0६ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या तिस-या टर्मच्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्याने त्यांनी राज्यसभा खासदार पदाची हॅट्ट्रिक केली आहे. राज्यसभेतील हॅट्ट्रिक बद्दल ना. रामदास आठवले यांचे देशभरातील दलित बहुजन आंबेडकरी जनते सह सर्व वर्गातील जनतेने अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातुन राज्यसभेवर 7 खासदार बिनविरोध निवडुन गेलेले आहेत. त्यात ना. रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यसभेवर सलग तिस-यांदा बिनविरोध निवड होवून ना. रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार म्हणून हॅट्रीक केलेली आहे. आपल्या राज्यसभेच्या तिस-या टर्मची सुरुवात ना. रामदास आठवले यांनी आज सोमवार दिनांक 6 एप्रिल2026 पासुन केली आहे.
ना. रामदास आठवले यांची एप्रिल 2014 ला सर्वप्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये दुस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल 2020 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत त्यांच्या दुस-या टर्मची मुदत होती. आज सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत ना. रामदास आठवले आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या
तिस-या टर्मला सुरुवात झाली आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 ते एप्रिल 2032 पर्यत ना.रामदास आठवले यांची राज्यसभेत तिसरी टर्म राहणार आहे. तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे देशभरातील दलित, बहुजनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केले आहे. देशभर ना. रामदास आठवले यांचे सत्कार आणि स्वागत होत आहे. ना.रामदास आठवले यांना तिस-यांदा राज्यसभेवर निवडुन दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभरातील आंबेडकरी रिपब्लकन जनतेतर्फे हार्दिक आभार मानले जात आहे.
आपल्या तिस-या राज्यसभा सदस्यत्वाची ना. रामदास आठवले यांनी आज सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर आंबेडकरी जनतेने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख
