March 27, 2026

रामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

0
IMG-20260327-WA0032
Spread the love

भाविक व नागरिकांचा उदंड प्रतिसाद

पुणे:   रामनवमीनिमित्त धायरी परिसरात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत स्थानिक नागरिक, युवक व महिला मोठ्या उत्साहाने पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले. या शोभायात्रेमुळे धायरीत प्रचंड उत्साहाचे, भक्तिपूर्ण आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

सरकार प्रतिष्ठान, अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली. लक्ष्मी मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आशिष बेनकर, अक्षय उंदरे, गणेश साखरे, सचिन सोनवणे, संदीप स्वामी, गणेश पासलकर, गणेश खामकर, अजिंक्य जाधव यांनी ही यात्रा भव्य आणि देखण्या स्वरूपात पार पाडली.

भव्य रथावर फुलांची आरास आणि दिव्यांची रोषणाई, त्यात प्रभू श्रीरामांची धनुर्धारी प्रतिमा स्थापित करण्यात आली. या रथाच्या समोर सध्या समाजातील अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेल्या महिलांवरील अत्याचार आणि विशेषतः लव्ह जिहादच्या नावाखाली होणारी महिलांची फसवणूक याबाबत जनजागृती करणारे देखावे, आणि चित्र यांचा समावेश असलेला रथ मार्गक्रमण करत होता. म मल्हारी खंडेराय आणि बानू यांच्या विवाहाचा देखावा आणि पारंपारिक कर्नाटकी देखावाही एका रथावर साकारण्यात आला.

शंखवादन पथक, परशुराम वाद्य पथक, ढोल लेझीम पथक, बँड पथके, वारकरी भजनी मंडळ यांनीही शोभायात्रेत सहभागी होऊन त्यात रंग भरले. शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या बाजूला गर्दी केली. गणेश नगरी ते धायरी फाटा या मार्गावर काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमुळे परिसरातील वातावरण पावित्र्यमय बनले.

शोभा यात्रेचे हे दुसरे वर्ष असून अल्पावधीतच या उपक्रमाला धायरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये धर्मभावना, संघटितपणाची वृत्ती निर्माण करण्याबरोबरच विविध सामाजिक प्रश्नाबाबत वाचा फोडणे व जनजागृती करणे, या उद्देशाने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या रथयात्रेचे आयोजन केले जात असल्याची माहिती गणेश साखरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी