March 23, 2026

-गाईमध्ये देशाच्या अर्थकारणाला वेगळी दिशा देण्याची ताकद

0
IMG-20260322-WA0019
Spread the love

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ; गौ टेक ग्लोबल समिट व एक्स्पो ; सोमवारी (दि.२३) शेवटचा दिवस

पुणे : आपण परंपरागत गायीला माता म्हणतो, मात्र गायीपासून इतकी उत्पादने तयार होऊ शकतात हे आपल्याला माहित नाही. गोमूत्र, शेणापासून साकारलेल्या अनेक वस्तूंचा समावेश या अद्भुत अद्वितीय प्रदर्शनात आहे. सर्वसामान्य माणसाला याची कल्पना येऊ शकत नाही, की गायीचे काय काय उपयोग आहेत. देशाच्या अर्थकारणाला वेगळी दिशा देण्याची ताकद गाईमध्ये आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) यांच्या वतीने, महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर. आर. काबेल यांच्या सहकार्याने “गौ टेक २०२६” या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनाचे आयोजन कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह अनेक मान्यवरांनी भेट दिली.

जीसीसीआयचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया, महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष व गौ टेक २०२६ चे आयोजनाध्यक्ष शेखर मुंदडा यावेळी उपस्थित होते. संत समागम यांसह शेतीतील मातीची गुणवत्ता आणि गायीच्या माध्यमातून मिळणारी विविध उत्पादने याविषयी प्रदर्शनात विविध कार्यक्रम चर्चासत्रे तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिला बचत गटांचे स्टॉल देखील प्रदर्शनात आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रामीण भागामध्ये गायीच्या शेणाचे करायचे काय? हा अनेक शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. त्यावेळी गोबर गॅस ने समाजाची सगळी गरज पूर्ण करता येऊ शकते. सरकारने देखील गोशाळांना अनुदान देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आपण गाय आणि त्याच्याशी निगडीत मिळणाऱ्या उत्पादनांकडे लक्ष द्यायला हवे.

आयोजक डॉ. वल्लभभाई कथिरिया म्हणाले, गौ टेक हे केवळ एक प्रदर्शन नसून गौ-आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर व संस्कारित बनविण्याच्या दिशेने एक व्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभियान आहे. गौ टेक २०२६ मध्ये धोरणकर्ते, समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार, शेतकरी, गौशाळा, विद्यापीठे, संत समाज, महिला व युवक देश-विदेशातून मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

आयोजक शेखर मुंदडा म्हणाले, प्रदर्शनामध्ये सेंद्रिय खत व बायो-फर्टिलायझर्स, दूध व मूल्यवर्धित दुग्ध उत्पादने, गौमूत्र व गोबरावर आधारित उत्पादने, नैसर्गिक शेती, पशुवैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे, सीमेन प्रयोगशाळा, सेक्स-सॉर्टेड सीमेन व एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान, सौर व बायो-एनर्जी, चारा व बियाणे उद्योग, चारागाह विकास यंत्रसामग्री, शासकीय व खासगी बँका, सहकारी संस्था, दुग्ध संघ व फेडरेशन, विविध राज्यांचे गौ सेवा आयोग, अॅनिमल फूड प्रोसेसिंग युनिट्स, इनोव्हेटिव्ह स्टार्ट-अप्स, संशोधन व विकासावर आधारित गौ-उत्पादने, भारतीय देशी गौ-नस्लांचे लाईव्ह प्रदर्शन तसेच नॅचरोपथी, आयुर्वेद व पंचगव्य आधारित उपचार पद्धतींशी संबंधित स्टॉल्स सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन सोमवार, दि. २३ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या आयोजनात शेखर मुंदडा, रमेश घेटीया, हंसराज गजेरा, अमिताभ भटनागर (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), पुरीश कुमार (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), डॉ. गिरीश शाह, डॉ. नितीन मार्कंडेय, संजय भोसले, उद्धव नेरकर, डॉ. सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, मनीष वर्मा, परेश शाह तसेच इतर अनेकांसह डॉ. दिलीप कुलकर्णी, मंगल अकोले, डॉ. महेश लोहार, विनायक बोरोळे पाटील, कौस्तुभ देशपांडे, मल्हार चनियारा, रमेश ओसवाल, भाग्यश्री चौंडे, अश्विनी पाटील, डॉ. देशमुख, राजेंद्र चौहान, दिलीप काळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

फोटो ओळ : ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज यांच्या वतीने महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर. आर. काबेल यांच्या सहकार्याने “गौ टेक २०२६” या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी