March 20, 2026

‘भाजपकडून मिळत आहे पदाबरोबरच मानसन्मान’

0
IMG-20260318-WA0015
Spread the love

नाराजीबद्दलचे वृत्त गैरसमजातून आल्याचा वाडेकर यांचा खुलासा

रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असल्याने महापालिकेत आपल्याला उपमहापौर पद मिळाले असले तरी योग्य तो मानसन्मान मिळत नसल्याने आपण नाराज असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले आहे. हे वृत्त गैरसमजातून आले असून आपली कशाबद्दलही नाराजी नाही, असा सुस्पष्ट खुलासा उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केला आहे.

महापालिकेच्या अनेक कार्यक्रमांना आणि बैठकांना उपमहापौरांना निमंत्रण दिले जात नाही. विशेषतः खुद्द वाडेकर यांच्या प्रभागात झालेल्या महापौर चषक स्पर्धेला त्यांना निमंत्रण नव्हते, असे या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा प्रकार तांत्रिक त्रुटीमुळे झाल्याचे स्पष्टीकरण वाडेकर यांनी दिले.

रिपब्लिकन पक्ष महापालिका निवडणूक भाजपच्या सोबत राहून लढला. महापालिका विषयातील आपल्या पक्षाचे योगदान लक्षात घेऊन भाजपने आपल्याला उपमहापौर पद दिले. पदाबरोबरच योग्य प्रकारे मानसन्मान देखील भाजपकडून मिळत आहे. त्यामुळे नाराजीचे कोणते कारणच नाही, असे वाडेकर यांनी स्पष्ट केले.

भाजप आणि रिपब्लिकन पक्ष हे दीर्घकालीन मित्र पक्ष असून ते सत्ता आणि पदासाठी एकत्र आलेले नाहीत. व्यक्तिगत मानसन्मानावरून या मित्र पक्षांमध्ये धुसफूस होणे केवळ अशक्य आहे. भाजप आणि रिपब्लिकन पक्ष हे आजही मित्रपक्ष आहेत आणि यापुढेही मित्रपक्ष राहतील. एकोप्याने आणि कार्यक्षमतेने महापालिकेच्या कारभाराचा गाडा सुरळीत चालवून पुणेकरांचे जीवन सुलभ, समृद्ध आणि समाधानी करणे हेच आमचे समान उद्दिष्ट आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले.
तसेच मी कुठलीही बैठक किंवा पत्रकार परिषद घेतली नाही तरी कारण नसताना अशा बातम्या आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी