February 15, 2026

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचा नव्या ३ डिलरशीपसह पुण्यात विस्तार

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे, महाराष्ट्र, 2 डिसेंबर 2025: कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेडच्या इलेक्ट्रिक वाहन विभाग कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडने आज पुण्यात तीन नवीन खास 3S (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर्स) डीलरशिप्सचे उद्घाटन झाले. दापोडी, हडपसर आणि कोथरूड परिसरात ही डिलरशीप्स सुरू झाली आहे. या नव्या विस्तारामुळे कायनेटिकच्या स्वतःच्या शहरात कायनेटिक इव्ही रिटेल आणि सर्व्हिस नेटवर्क लक्षणीयरित्या बळकट करतात आणि या ब्रॅंडच्या राष्ट्रीय प्रसाराच्या धोरणाला वेग देतात.

विश्रांतवाडी येथे अलीकडेच सुरू झालेल्या कायनेटिकच्या पहिल्या खास EV डीलरशिपनंतर ही विस्तार घोषणा करण्यात आली आहे. अशाप्रकारे या कंपनीच्या आता पुण्यात चार डीलरशिप्स झाल्या आहेत. पुणे हे कायनेटिक ऑटोमोटिव्ह वारशाचे जन्मस्थान असल्याने त्याचे आगळे महत्त्व आहे. हा वेगाने होत चाललेला प्रसार एकामागून एक मोठ्या मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या या ब्रॅंडच्या धोरणास बळकटी देतो. डीलरशिप बांधव आणि ग्राहक यांच्याकडून झटपट मिळणारा उत्तम प्रतिसाद हा कायनेटिक ईव्ही श्रेणी, त्यातील इंजिनियरिंगची गुणवत्ता आणि त्यांच्या एक मजबूत EV ईकोसिस्टम उभारण्याच्या दीर्घकालीन वचनबद्धतेतील वाढत्या विश्वासाची साक्ष देतो.

या प्रसंगी बोलताना कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य फिरोदिया म्हणाले, “आमच्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. कारण पुण्यातच कायनेटिकचा वारसा जन्माला आला. या शहरात आज तीन नवीन शोरूम्स सुरू झाली आहेत आणि अशाप्रकारे पुण्यात आता एकूण चार डीलरशिप्स आहेत. यांच्या पाठबळावर आम्ही दर्जेदार इलेक्ट्रिक मोबिलिटी सहजप्राप्य, हवीहवीशी आणि मेड इन इंडिया बनवण्याच्या आमच्या ध्येयाला वेग देत आहोत.”

ते पुढे म्हणाले, “आमचे डीलर भागीदार आणि ग्राहक यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे उत्पादन आणि मार्केटची क्षमता याबाबतचा आमचा विश्वास देखील बळावला आहे. वाहनांची डिलिव्हरी आता सुरू झाली असून, त्याने चांगलाच वेग पकडला आहे. आणि कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स पुढे होऊन नेतृत्व करण्यास सज्ज आहे.”

ही डीलरशिप्स खालील ठिकाणी सुरू झाल्या आहेत:

  • अॅम्बियन्स ऑटोमोबाइल्स – दापोडी: तळ मजला, दुकान नंबर 1, तेजा सिंह बिल्डिंग, मुंबई पुणे मार्ग, दापोडी मेट्रो स्टेशनसमोर, पिंपरी-चिंचवड, पुणे – 411012
  • अॅम्बियन्स ऑटोमोबाइल्स – हडपसर: अमर मनोर, क्रोम प्लाझा, पुणे-सोलापूर मार्ग, क्रोम फर्निचर जवळ, भास्कर कॉलनी, स्वामी विवेकानंद नगर, लक्ष्मी नगर, हडपसर, पुणे, महाराष्ट्र 411013
  • यश ऑटो मोटर्स LLP – कोथरूड: प्लॉट नंबर 74, श्री प्रसाद कॉम्प्लेक्स, पौड रोड, महागणेश कॉलनी, कोथरूड, पुणे – 411038

ही प्रत्येक डीलरशिप संपूर्णरित्या कार्यान्वित कायनेटिक लॅब सर्व्हिस सुविधेद्वारा समर्थित आहे, जी खरेदीनंतरची देखभाल, तज्ज्ञ टेक्निशियन साहाय्य आणि स्पेअर पार्ट्सची उपलब्धता सुनिश्चित करते.

नवी कायनेटिक EV रेंज प्रसिद्ध कायनेटिक DX ला एक आधुनिक, व्यावहारिक आणि कुटुंबासाठी अनुकूल इलेक्ट्रिक स्कूटरच्या रूपात पुन्हा सादर करत आहे. मजबूत मेटल बॉडी, प्रशस्त फ्लोरबोर्ड आणि या सेगमेन्टमधील श्रेष्ठ 37-लीटर सीटखालील स्टोरेज ही वैशिष्ट्ये असणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर मूळ गाडीचा सगळ्यांचा आवडता DNA कायम ठेवून आजच्या शहरी जीवनशैलीसाठी ती अनुकूल व्हावी या दृष्टीने बनवण्यात आली आहे.

या कायनेटिक EV शोरूम्समध्ये दोन्ही व्हेरियन्ट असतील: कायनेटिक DX आणि कायनेटिक DX+. या दोन्हीमध्ये एक दमदार 2.6 KWh रेंज X LFP बॅटरी आहे. यातील मुख्य फीचर्स आहेत- K-कोस्ट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स असिस्ट, हिल-होल्ड असिस्ट आणि यात तीन राईड मोड आहेत: रेंज, पॉवर आणि टर्बो.

DX+ व्हेरियन्ट टेलीकायनेटिक अॅपमार्फत स्मार्ट कनेक्टिव्हिटी देते. त्यामध्ये रियल-टाइम राईड डेटा, जिओ-फेन्सिंग, इंट्रूडर अलर्ट, “फाइंड माय कायनेटिक” आणि माय कायनी व्हॉईस अलर्ट्स आहेत. ब्लूटुथ म्युझिक आणि व्हॉईस नेव्हीगेशन सारखी अतिरिक्त फीचर्स दैनंदिन प्रवासातील सोयिस्करपणा वाढवतात.

कायनेटिक DX ची किंमत 1,11,499 रु. आहे, तर कायनेटिक DX+ ची किंमत 1,17,499 रु. आहे (दोन्ही किंमती एक्स-शोरूम). 9 वर्षांपर्यंत किंवा 1 लाख किलोमीटरपर्यंत (जे आधी होईल ते) कव्हरेज देणाऱ्या वाढीव वॉरंटी पॅकसह ग्राहक आपला मालकीचा अनुभव आणखी सुधारू शकतात. तसेच 100 किमी पर्यंत रोडसाइड असिस्टन्स (RSA) कव्हरेज मिळवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी