February 15, 2026

दगडूशेठ गणपती ट्रस्टचाकॅन्सर रुग्णांना दिलासा

0
IMG-20251206-WA0044
Spread the love

पेट सीटी स्कॅन तपासणीत
७०टक्के सवलत

पुणे : कॅन्सर निदानासाठी कराव्या लागणाऱ्या पेट सीटी स्कॅन तपासणीत ७० टक्के सवलत देण्यात येते. आजपर्यंत तीन वर्षात १३हजार५६८ रुग्णांनी सुविधेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून विविध सवलती दिल्या जातात, तपासण्या केल्या जातात, आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येतात. आजपर्यंत हजारो रुग्णांना त्यातून मदत झाली आहे. या उपक्रमात कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी पेट सीटी स्कॅन तपासणीमध्ये ७० टक्के सवलत दिली जाते. या तपासणीसाठी अंदाजे २० ते २२हजार रुपये खर्च येतो. ट्रस्टच्या कार्यालयातून रुग्णांना पत्र दिले जाते. त्या पत्रामुळे रुग्णाला ७०टक्के सवलत मिळते. ही सवलत दिलासा देणारी असते. या योजनेत रुबी हॉल क्लिनिक (पुणे), आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, स्पेक्ट लॅब, बावधन (पुणे), एन एम मेडिकल डायग्नोस्टिक सेंटर पुणे, एस डी एम डायग्नोस्टिक सेंटर अशा सहा रुग्णालयांचा समावेश आहे, अशी माहिती रासने यांनी दिली.

गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी २५०, बुधवार पेठ, गणपती भवन, पुणे येथे रविवार सोडून अन्य दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात संपर्क साधावा, असे आवाहन सुनील रासने यांनी केले आहे.

कळावे.

आपला,
सुनील रासने,
अध्यक्ष,
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी