February 15, 2026

पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी ॲड. मुकेश परदेशीसन २०२५-२६ करिता पदाधिकारी निवड

0
IMG-20250813-WA0027
Spread the love

पुणे : पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी ॲड. मुकेश परदेशी यांची निवड झाली आहे. असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये ही निवड झाली. उपाध्यक्षपदी ॲड. राजेश ठाकूर, सचिवपदी ॲड. गजानन गवई आणि खजिनदारपदी ॲड. विजय टिळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड सन २०२५-२६ या वर्षांकरिता करण्यात आली आहे.

असोसियेशनची कार्यकारी मंडळ २०२३ ते २०२८ अशी निवड आहे. दरवर्षी पदाधिकारी निवडले जातात. असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मोहन फडणीस यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी यांचा सन्मान करीत कार्यभार देण्यात आला.

असोसिएशनमध्ये ॲड. हेमंत फाटे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी ॲड. अश्विनी नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये ॲड. मोहन फडणीस, ॲड. अमृता गुरव, ॲड.दिलीप हांडे, ॲड.डी.डी.शहा, ॲड. अमित टकले, ॲड. डॉ. रोहिणी पवार हे असणार आहेत.

ॲड. मुकेश परदेशी हे गेली २० वर्षे मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयात वकिली व्यवसाय करतात. पुण्यातील नामवंत संस्थांची कामे त्यांच्याकडे आहेत. पीटीपीए पुणे च्या सर्व सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

  • फोटो ओळ : पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी ॲड. मुकेश परदेशी यांची निवड झाली आहे. यावेळी उपस्थित विश्वस्त व पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी