February 16, 2026

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे दूरदर्शी पाऊलएमआयटी डब्ल्यूपीयु चे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस ; ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

0
IMG-20250624-WA0036
Spread the love


पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा करताना आज आपण शाळा व महाविद्यालयात कोणती शिक्षण पद्धती वापरतो, हा विचार करायला हवा. आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय तत्वज्ञानाचा समावेश धोरणमध्ये आहे. शिक्षकांची यामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे दूरदर्शी पाऊल आहे, असे मत एमआयटी डब्ल्यूपीयु चे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस यांनी व्यक्त केले.

भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नऱ्हे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयु चे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, डॉ. दत्तात्रय तापकीर, संस्थेचे प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, अ‍ॅड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर यांसह प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.

डॉ. आर.एम चिटणीस म्हणाले, शिक्षक हे केवळ माहितीचे वाहक नसून उत्तम व्यक्तिमत्व घडविणारे आहेत. तसेच आपली भारतीय संस्कृती देखील पुढे नेणारे आहेत. आजच्या आधुनिक युगात वेद, वेदांत याचा उपयोग शिक्षणात शिक्षक कसा करतील, हे पाहणे महत्वाचे आहे,

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, पुरातन काळापासून शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आई, वडील आणि शिक्षक हे देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात. आज भारतीय संस्कृती जपणारे शिक्षक आणि संस्था यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या परिषदा महत्वाच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल शिक्षकांमध्ये जागरूकता याविषयी डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी मार्गदर्शन केले.

  • फोटो ओळ : भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नऱ्हे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी