July 4, 2025

कशिश सोशल फाउंडेशनच्या फॅशन शो मधून भारतीय सैन्याला अनोखी मानवंदना

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

‘ उन्होंने धर्म पुछकर मारा, हमने कर्म देखकर मारा’ बॅनर्स ठरले लक्षवेधी

चिंचवड : पाकिस्तानने पहलगाम येथे भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीय नागरिकांना मारले, या हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून जबरदस्त बदला घेऊन पाकला धडा शिकवला. भारतीय सैन्याच्या या पराक्रमाला कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित फॅशन शो मधून अनोखी मानवंदना देण्यात आली. भारतीय सैन्याच्या कर्तुत्वाला फॅशन शोच्या माध्यमातून सलाम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स तर्फे मिस / मिसेस / मिस्टर इंडिया एलिट आणि रायझिंग स्टार या फॅशन शोचे आयोजन केले होते. हा फॅशन शो मोठ्या दिमाखात एलप्रो मॉल,चिंचवड येथे संपन्न झाला. यावेळी पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार,डॉ श्रद्धा जवंजाळ,मुकेश रूपवते,राज रणदिवे,आनंद खुडे,डॉ श्रद्धा जाधवर,डॉ शशिकांत शेटे, महेशकुमार सरतापे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्पर्धकांनी हाती घेतलेल्या ‘उन्होंने धर्म पुछकर मारा, हमने कर्म देखकर मारा’ बॅनर्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे यावेळी देण्यात आले.

या अनोख्या फॅशन शो विषयी बोलताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स च्या वत्तीने हा फॅशन शो आयोजित केला होता. आम्ही यापूर्वी महिलां मध्ये स्वच्छता, मासिक पाळी आदीं बाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करत असतो. मागील वर्षी काश्मीरच्या खोऱ्यात भारत – पाक सीमे लगतच्या गावांमध्ये आम्ही भारतीय सैन्यांच्या मदतीने आमचा उपक्रम राबविला होता,त्यावेळी सैन्याचे कार्य अगदी जवळून अनुभवता आले होते. यामुळेच ऑपरेशन सिंदूर च्या यशा बद्दल भारतीय सैन्याला मानवंदना देण्यासाठी या अनोख्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील 3 ते 55 वयोगटातील 75 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते असेही पवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे बंड्या यांनी केले.

स्पर्धेचा निकाल :-

किड्स
विजेते: ध्रुवा राठोड, वृषाली काटकर, ओम जगदाळे, माही महानोर

उपविजेते : अनीश त्रिगुणे, ईशा दिहिंगिया, नायरा सुर्वे, अमेय खनकाळ, स्वरा पाथरुडकर, इश्वरी काटकर

मिस्टर
विजेता: अनिकेत मेहेर
उपविजेते: सिद्धार्थ मेश्राम, अथर्व जगताप

मिसेस
विजयी: सपना भावे

मिसेस
विजयी: आदिती तुडवेकर
उपविजेते: नयना कालेकर, तेजस्वी पाटील

मिस
विजयी: सानिका जौंजाळ
उपविजेते: तनिष्का कोल्हापूरकर,
रिया शर्मा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button