July 4, 2025

सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार

0
IMG-20250523-WA0037
Spread the love

‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान

पुणे : सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल स्पर्धा. पुणे आयडॉल स्पर्धा ही विविध चार गटात होते. या स्पर्धेची महाअंतिम फेरी उद्या (शनिवार) 24 मे 2025 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी दिली.

पुणे आयडॉल स्पर्धेचे यंदा 23 वे वर्ष आहे. यंदा या स्पर्धेत सातशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते, स्पर्धेची प्राथमिक आणि उपांत्य फेरी पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे पार पडली, तर अंतिम फेरी शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार आहे. सकाळी 10 वा. अंतिम फेरीचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने होणार आहे. तर पारितोषिक वितरण दुपारी 3 वाजता केंद्रीय सहकार, विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धिरज घाटे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

पुणे आयडॉल स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व गायन कला जोपासणाऱ्या व्यक्तींचा ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो, यंदा डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते दुपारी 2 वाजता सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ गायक राजेश दातार, जितेंद्र भुरुक, मंजुश्री ओक करणार आहेत. तसेच या दरम्यान जितेंद्र भुरुक यांच्या ‘गीतो का सफर’ या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. तरी पुणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button