इलेक्ट्रिक वाहन खरेदीत लक्षणीय वाढटाटा नेक्साँन ईव्हीला अधिक पसंती.खाजगी सर्वेक्षणातील निष्कर्ष

पुणे, (३० एप्रिल २०२५): अक्षयतृत्तीयेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या प्रमाणात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या स्पर्धेत टाटा नेक्साँनला ग्राहकांची अधिक पसंती मिळाली असल्याचे एका खाजगी सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
वाहनच्या अभ्यास अहवालानुसार, पारंपरिक इंटर्नल कंबस्चन इंजिनाच्या (ICE) तुलनेत इलेक्ट्रिक व्हेईकल्ससाठी ग्राहकांना किंमत अधिक मोजावी लागत आहे. पण दुसरीकडे दीर्घकालीन फायदे पाहता शाश्वत आणि किफायतशीर मोबिलिटी सोल्यूशन्सच्या शोधात असणाऱ्या खरेदीदारांसाठी EVs एक अधिक चांगला पर्याय ठरतो. परिणामी, इलेक्ट्रिक प्रवासी वाहन सेगमेन्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
VAHAN च्या डेटा अनुसार, CY2024 मध्ये रिटेल विक्री ८९,००० गाड्यांच्या वर पोहोचली असून मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ २२% आहे. या वृद्धीमधून EV बाजारातील व्यापक ट्रेंड दिसतो, ज्यात एकूण १९ लक्ष युनिट्स विकली गेली आहेत. यात एकूण २७% वाढ झाली आहे. ईव्ही प्रोत्साहनासाठी सरकारी धोरणे आणि ग्राहकांची वाढती लोकप्रियता यांचे पाठबळही ईव्हीच्या खरेदीवर दिसून येत आहे.
EVs मधील आर्थिक फायदा
EV च्या मालकीशी संबंधित खर्चांचा बारकाईने अभ्यास केल्यास, असे दिसून येते की, वेगवेगळ्या आघाड्यांवर लक्षणीय बचत होते. नेक्साँन डाँट ईव्हीसारख्या मॉडेल्सचा एकूण संपादन खर्च अधिकाधिक स्पर्धात्मक होत आहे, कारण बॅटरीच्या किंमती कमी होत आहेत. समकक्ष पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि सीएनजी वाहनांशी तुलना केल्यास नेक्साँन डाँट ईव्हीमुळे एक अधिक चांगले मूल्य मिळते.
प्रारंभिक खरेदीनंतर, ईव्हीचे मूल्य लाभ आता आणखी स्पष्ट दिसू लागले आहेत. आयसीई वाहनात इंधन भरण्यापेक्षा ईव्ही चार्जिंग करणे हे लक्षणीयरित्या स्वस्त आहे. शिवाय, या वाहनात हालचाल करणारे भाग कमी असल्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो, त्यामुळे एक किफायती पर्याय म्हणून ईव्ही आणखी आकर्षक वाटतात. त्यात, रूफटॉप सोलर सिस्टम बसवली, तर बचत आणखीनच वाढते आणि ईव्हीचे मालक शून्य खर्चात मोबिलिटी साध्य करू शकतात आणि चार्जिंगसाठी अक्षय ऊर्जेचा वापर करून ऊर्जेच्या खर्च देखील वाचवू शकतात. असे केल्यास, इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अंगिकार करणे आणखीन फायदेशीर ठरते.
नेक्साँन डाँट ईव्हीसाठी दैनिक इंधनाचा खर्च केवळ ४३.६२ रु. आहे. जो पेट्रोल वाहनासाठी ३०३.२९ रु. आणि समकक्ष डिझेल वाहनासाठी १९१.३४ रु. आहे. हाच ईव्हीसाठीचा आर्थिक फायदा आहे.. यानुसार, इंधनाचा वार्षिक खर्च नेक्साँन डाँट ईव्हीसाठी १५७०३ रुपये होतो तर पेट्रोल आणि डिझेल गाड्यांसाठी अनुक्रमे १,०९,१८४ रु. आणि ६८,८८३ रु. होतो. सीएनजीसाठी हा खर्च ५४,३३२ रु. होतो. त्याबरोबर देखभालीचा कमी खर्च देखील विचारात घेतला तर ईव्ही एक किफायतशीर सोल्यूशन देतात. त्या केवळ पैसे वाचवत नाहीत, तर मालकीचा एकंदर अनुभव देखील अधिक चांगला करतात.
दीर्घकालीन संचालन खर्चातील फायदे
इतर वाहनांच्या प्रकारांच्या तुलनेत नेक्साँन डाँट ईव्हीचा वार्षिक संचालन खर्च लक्षणीयरित्या कमी आहे. पाच वर्षाच्या वापरात हा फरक अधिक स्पष्ट होतो. नेक्साँन डाँट ईव्हीसाठी पाच वर्षांचा एकूण खर्च १,७७,४५८ रु. होतो तर त्याच्या तुलनेत पेट्रोलसाठी तो ६,५०,९१२ रु., डिझेलसाठी ४,५६,४०४ रु., हायब्रिडसाठी ४,७३,९४७ रु. आणि सीएनजीसाठी ३,७८,६२५ रु. होतो.