September 8, 2026

बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : उपमहापौर परशुराम वाडेकर

0
IMG-20260903-WA0049
Spread the love

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : बोपोडी परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामांना गती मिळावी आणि बोपोडीचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बोपोडी येथील रेडीरेकनरचा दर वाढविण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुण्याचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर हे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
आज दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी मा. सतीश कुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), मा. अर्चना पाटील, उपजिल्हाधिकारी तसेच मा. ऋषिकेश घाटे, सहाय्यक अधिकारी यांच्यासमवेत बोपोडी परिसरातील सर्व्हे नं. २३ व २४, नाईक चाळ, भोईटे चाळ, इंदिरा वसाहत, आदर्श नगर तसेच सर्व्हे नं. ५३ व ५४, बोपोडी, मुंबई-पुणे रोड या भागांची पाहणी केली.
यावेळी बोलताना मा. परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, बोपोडी परिसरातील सुमारे ७० टक्के भाग झोपडपट्टी क्षेत्रात येतो. या परिसरातील रेडीरेकनरचा दर तुलनेने कमी असल्यामुळे विकासकांना येथे SRA योजनेच्या माध्यमातून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यास अपेक्षित आर्थिक व्यवहार्यता मिळत नाही. परिणामी अनेक विकासक बोपोडी परिसरात SRA योजना राबविण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बोपोडी परिसरातील नागरिकांना चांगली घरे, मूलभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास मिळण्यासाठी रेडीरेकनरच्या दरात योग्य ती वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे. रेडीरेकनरचा दर वाढल्यास SRA प्रकल्पांसाठी विकासकांना प्रोत्साहन मिळेल आणि रखडलेल्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी बोपोडीतील रेडीरेकनरचा दर वाढविणे हा महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो, असेही मा. वाडेकर यांनी सांगितले.
यासंदर्भात लवकरच मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोपोडी परिसरातील रेडीरेकनरचा दर वाढविण्याची मागणी ठोसपणे मांडण्यात येणार असल्याचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी स्पष्ट केले.

पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेलाजयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेलापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेलाजयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेलापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी