September 9, 2026

पुण्यात रंगणार ‘ग्लोबल गणेश वाट’; ८ देशांतील सहभागी जोडले जाणार गणपती संस्कृतीशीगणेश चतुर्थीच्या वीकेंडला जे. एम. रोड परिसरात सांस्कृतिक खजिना शोध स्पर्धा

0
IMG-20260907-WA0020
Spread the love

पुणे, ७ सप्टेंबर २०२६ : पुण्याच्या समृद्ध गणपती परंपरेचा इतिहास, संस्कृती आणि वारसा जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संस्कृती तर्फे भारतातील पहिली गणपती सांस्कृतिक खजिना शोध स्पर्धा ‘ग्लोबल गणेश वाट’ आयोजित करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या वीकेंडला, १९ व २० सप्टेंबर रोजी पुण्यात ही अनोखी स्पर्धा रंगणार आहे. अशी माहिती संस्कृती संस्थेचे निसर्ग उदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या स्पर्धेत आठ देशांतील सहभागी एकाच वेळी पुण्याच्या गणपती संस्कृतीशी जोडले जाणार आहेत. कुटुंबे, विद्यार्थी आणि नागरिकांना श्रद्धा, इतिहास व परंपरेवर आधारित विविध सांस्कृतिक सुगावे उलगडत जे. एम. रोडच्या सुमारे पाच किलोमीटर परिसरात खजिना शोधावा लागणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेची सुरुवात आणि सांगता जे. एम. रोडवरच होणार आहे.

पुणे ते फुकेत सांस्कृतिक सेतू

‘ग्लोबल गणेश वाट’चे प्रमुख आकर्षण म्हणजे पुणे ते फुकेत असा निर्माण होणारा सांस्कृतिक दुवा. स्पर्धेतील विजेत्यांना थायलंडमधील फुकेत येथील श्रीमंत गणपती बाप्पा देवळाई येथे कुटुंबासह सहलीची संधी मिळणार आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर आणि फुकेतमधील गणपती प्रती दगडूशेठ या दोन गणपती परंपरांना जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. हा उपक्रम फुकेत येथील श्रीमंत गणपती बाप्पा देवळाईचे समन्वयक चेतन लोढा यांच्या सक्रिय सहकार्याने राबविण्यात येत आहे.

पुणेकर NRI एडिशनही

‘ग्लोबल गणेश वाट’चे Pune NRI Edition देखील यंदा सादर करण्यात आले आहे. सिंगापूर, यूके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कतार, मलेशिया आणि थायलंड येथील पुणेकर NRI कुटुंबे WhatsAppच्या माध्यमातून पुण्यातील आपल्या कुटुंबीयांना रिअल टाइममध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे जगभरातील पुणेकरांना गणेशोत्सवाशी जोडण्याबरोबरच एक जागतिक लीडरबोर्ड तयार होणार आहे.

या उपक्रमासाठी निसर्गशाळा कॅम्पसाइट भागीदार, मावळा बोर्डगेम्स बोर्डगेम्स भागीदार असून, डीसकव्हर पुणे चे माधुर बर्वे खजिना शोधातील सुगाव्यांची रचना करीत आहेत.

SansCreatee ही पुण्यातील अनुभवात्मक खजिना शोध कंपनी असून संस्थेने भारतासह इंडोनेशिया, थायलंड, हाँगकाँग, जर्मनी आणि अमेरिका या देशांमध्ये ३२ हून अधिक खजिना शोध स्पर्धांचे आयोजन केले आहे. ‘ग्लोबल गणेश वाट’च्या माध्यमातून पुण्याची गणपती परंपरा नव्या आणि मनोरंजक पद्धतीने जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी +91 751 751 0899 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.sanscreatee.com या संकेतस्थळाला बेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी