श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २५ वर्षांपासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे मोफत तुळशी रोप व औषधी रोपांचे वाटप करीत आहोत.
पुणे :पर्यावरणाचा विचार करून समाजामध्ये पर्यावरण रक्षणाचा विचार रुजला पाहिजे हा यामागील उद्देश आहे. शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक परदेशी व सर्व सदस्य तसेच श्री स्वामी बॅग्जचे श्री राहुल जगताप व स्वामी बॅग्जचे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी १० वाजले पासून २५ हजार तुळशीरोप व औषधी रोपांचे वाटप श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान जवळ होणार आहे. तरी सर्व विठ्ठल भक्तांनी अवश्य कार्यक्रमास उपस्थित राहावे. यासाठी विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट विठ्ठलवाडी, पोलीस अधिकारी, विजयश्री मित्रमंडळ तसेच स्थानिक राजकीय प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभते असे श्री स्वामी बॅग्जचे राहुल जगताप, शान्तिनिकेतनचे अध्यक्ष बाळा परदेशी, वैभवी जगताप, प्रणोती जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.