September 20, 2026

-फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटीच्या लोगोचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण; जेआयटीसोबत सामंजस्य करार

0
IMG-20260920-WA0004
Spread the love

पुणे, दि. १९:
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील ‘जेआयटी’ महाविद्यालयाच्या भेटीदरम्यान ‘फ्युएल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्युअरशिप युनिव्हर्सिटी’च्या (एफएसयू) अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. कौशल्य विकास व उद्यमशीलता शिक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याच वेळी जेआयटी आणि ‘फ्युएल’ यांच्यात कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

नागपूर येथील जेआयटी महाविद्यालयात ‘फ्युएल’तर्फे सीएसआर उपक्रमांतर्गत ‘एडब्ल्यूएस क्लाउड कौशल्य प्रशिक्षण’ राबवले जाते. या उपक्रमाची पाहणी आणि भेटीदरम्यान एफएसयूच्या अधिकृत लोगोचे लोकार्पण पार पडले. हा लोगो कौशल्य, नवोन्मेष आणि नवउद्योजकतेचे प्रतीक असून, तो विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची ओळख असणार आहे.

युवकांसाठी भविष्योन्मुख शिक्षण व कौशल्य विकास अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जेआयटी आणि फ्युएल यांच्यात सहकार्याचा करार करण्यात आला. या वेळी ‘एसएससीटी’चे अध्यक्ष महेश साधवानी, सचिव वीरेंद्र कुकरेजा आणि ‘फ्युएल’चे अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे उपस्थित होते.

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम क्रमांक २३, २०२६ अन्वये स्थापन झालेले हे विद्यापीठ उच्च शिक्षणात राज्याला राष्ट्रीय पातळीवर आघाडीवर नेण्याच्या शासनाच्या ध्येयाचा भाग आहे. या वेळी एफएसयूच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यापीठाच्या आगामी उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले.

कोट

हा केवळ एका लोगोचा अनावरणाचा कार्यक्रम नसून लाखो युवकांना कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे भविष्य घडवण्याचा संकल्प आहे.

  • डॉ. केतन देशपांडे, संस्थापक कुलगुरू, एफएसयू व अध्यक्ष फ्युएल.
  • फ्युएल स्किलटेक विद्यापीठ,पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी