June 25, 2026

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा- स्पेस एज्युकेशन संदर्भात शालेय स्तरावरील भारतातील पहिलाच प्रयोग

0
IMG-20260625-WA0030
Spread the love

पुणे : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणार आहे.. इयत्ता 6 वी ते 12 वी च्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 29 जुन 2026 ते 31 ऑगस्ट 2026 असल्याची माहिती  स्वान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सचिव विकास टाकळीकर , कोषाध्यक्ष अक्षय खोब्रागडे, सहसचिव गौरव सोमवंशी,प्रसाद भोपळे, अमन पाचघरे आणि संकेत जैन आदी उपस्थित होते.

शशिकांत कांबळे म्हणाले , “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच 2023 ला ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात आली त्या परीक्षे नंतर काही विध्यार्थीना आलाबमा सेंटर व सिंगापूर सायन्स सेंटर ला घेऊन. जाण्यात आले. यावर्षी 2 री नॉलेज नेक्स्ट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल. यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे.”

विकास टाकळीकर म्हणाले , “ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी 29 जून पासून नावनोंदणी करता येणार आहे. 30 ऑगस्ट 2026 पर्यंत नावनोंदणी सुरु राहील. या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑटोम्बर सत्कार होणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा आणि सिंगापूर सायन्स येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. .”

अक्षय खोब्रागडे म्हणाले, “आज पालक आपल्या मुलाने अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हावे, याकरिता अनेक प्रयत्न करताना दिसतात. परंतु ही परीक्षा अंतराळ एज्युकेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असेल.” यावेळी फाउंडेशन चे CEO प्रसाद भोपळे म्हणाले यापरीक्षेचे पहिले पारितोषिक आलाबमा येथील स्पेस सेंटर आणि दुसरे पारितोषिक सिंगापूर सायन्स सेंटर स्टडी टूर असे असणार आहे. अधिक माहितीसाठी https://swanrsfoundation.com/swan या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा +91 84848 72392 या क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. 

चौकट
“आज संपूर्ण जग विकासाच्या वाटेवर आहे. माणूस पृथ्वीपुरताच मर्यादित न राहता अवकाशातही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत. अंतराळासंबंधित प्रयोग, अभ्यास आणि संशोधन हे प्रत्येक देश स्वतःच्या पद्धतीने करत असतो. संबंधित संशोधनासाठी अनेक देशांनी स्वतःची अंतराळ संस्था (Space Agency) तयार केली आहे. जगातील १९५ देशांपैकी फक्त ७२ देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. ‘नासा’ ही त्यापैकी सर्वांत सुप्रसिद्ध एजन्सी आहे. तीस वर्षांपूर्वी डॉ. वॉन ब्राऊन यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी आणि या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवता यावीत, यासाठी यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर सुरु केले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी